Posts

Showing posts from July, 2018

Trek and The Real Trekkers

Image
माणूस जितका थोर तितका नम्र : काल दिनांक १५ जुलै २०१८ रोजी मुलुंड येथे झालेल्या १७व्या गिरिमित्र संमेलनामध्ये गिर्यारोहणामधील दिग्गज अश्या व्यक्ती पाहावयाला आणि ऐकवायला मिळाल्या. १४ अष्टहजारी शिखरे पादाक्रांत करणारे मिन्ग्मा शेर्पा, २२ वेळा एवरेस्ट सर करणारे कामी रिटा शेर्पा, नवं- नवीन गोष्टी शिकून त्या मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारे खु स्वी चौ, कमी वयामध्ये विविध शिखरे सर करणारे एअर फोर्स चे विंग कंमाडर देवदत्त पांडा, सहयाद्री मध्ये अपघात प्रसंगी मदतीला धावून जाणारया विविध गिर्यारोहण संस्था आणि त्यांचे सभासद, सर्वच जण अत्यतं नम्र आणि हसमुख, कोणी म्हणणार नाही के हे लोक आपल्या कामामुळे इतके मोठे आहेत ... मन भरून आले. ह्या पार्श्वभूमीवर हा छोटा लेख लिहण्यामागचे कारण म्हणजे आपल्याकडे फोफावत असणारे ट्रेकिंग चे वेड आणि पावसाळयात उगणाऱ्या भूछत्रा प्रमाणे तयार होणारे ट्रेकिंग ग्रुप्स आणि संस्था. सद्य परिस्तिथी : ट्रेकिंग हा पूर्वी छंद म्हणून आणि साहसी खेळ म्हणून बघितला जायचा. हाडाचे ट्रेकर ज्यांनी पुढील किती तरी चांगल्या ट्रेकर्स ना घडवले हे गिर्यारोहण , प...