Trek and The Real Trekkers
माणूस जितका थोर तितका नम्र :
काल दिनांक १५ जुलै २०१८ रोजी मुलुंड येथे झालेल्या १७व्या गिरिमित्र संमेलनामध्ये गिर्यारोहणामधील दिग्गज अश्या व्यक्ती पाहावयाला आणि ऐकवायला मिळाल्या. १४ अष्टहजारी शिखरे पादाक्रांत करणारे मिन्ग्मा शेर्पा, २२ वेळा एवरेस्ट सर करणारे कामी रिटा शेर्पा, नवं- नवीन गोष्टी शिकून त्या मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारे खु स्वी चौ, कमी वयामध्ये विविध शिखरे सर करणारे एअर फोर्स चे विंग कंमाडर देवदत्त पांडा, सहयाद्री मध्ये अपघात प्रसंगी मदतीला धावून जाणारया विविध गिर्यारोहण संस्था आणि त्यांचे सभासद, सर्वच जण अत्यतं नम्र आणि हसमुख, कोणी म्हणणार नाही के हे लोक आपल्या कामामुळे इतके मोठे आहेत ... मन भरून आले. ह्या पार्श्वभूमीवर हा छोटा लेख लिहण्यामागचे कारण म्हणजे आपल्याकडे फोफावत असणारे ट्रेकिंग चे वेड आणि पावसाळयात उगणाऱ्या भूछत्रा प्रमाणे तयार होणारे ट्रेकिंग ग्रुप्स आणि संस्था.
सद्य परिस्तिथी :
ट्रेकिंग हा पूर्वी छंद म्हणून आणि साहसी खेळ म्हणून बघितला जायचा. हाडाचे ट्रेकर ज्यांनी पुढील किती तरी चांगल्या ट्रेकर्स ना घडवले हे गिर्यारोहण , पदभ्रमंती करताना निसर्ग जपून सहयाद्री हा आपला माई बाप आहे हे बाळकडू नवीन पिढीला द्यायचे . सध्या मात्र सुसाट सुटलेले नवं ट्रेकर्स सर्व सहयाद्री मध्ये धिंगाणा घालू लागले आहेत. गिर्यारोहणामधील काहीहि अनुभव नसताना ट्रेक काढणे, सोबत कोणतेही बचाव सामग्री नसणे. ट्रेकिंग ला पिकनिक समजणे , मद्यपान -मुली आणि संगीत असल्याशिवाय जंगलामध्ये, डोंगरावर जाऊ नये असा थोर विचार असणारे हे महाभाग अपघातात सापडतात आणि गिर्यारोहणाला बदनाम करतात. सर्वसामान्य माणूस किल्ल्यावर जावा म्हणून शासनाने लाडाने अंजनेरी , हातगड, सिंहगड इत्यादी किल्ल्यावर रस्ते काढले आणि त्यांचे पिकनिक स्पॉट केले हे करताना किल्ल्याची दुर्गमता , झाडी गेली ज्याच्या जीवावर मराठे कित्तेक वर्षे मुघल सत्तेबरोबर झुंज घेत होते. त्यातच हे नवं ट्रेकर्स चे वादळ. हरिहर गडावर ५०० जण, कलावंतीण गडावर २००० जण , रस्ता जॅम, वरचे वर आणि खालचे खाली ह्या बातम्या रोजच्याच . वर्तमानपत्र मध्ये ट्रेकर चा मृत्यू व अपघात असा मथळा आला कि समजून घ्या कि कोणी तरी हौशी नवं ट्रेकर असणार किंवा पर्यटक , कारण विनाकारण धोकादायक जागा, अवघड किल्ले, पावसाळी मज्जा आणि माज करणेसाठी खरा ट्रेकर कधीच जात नाही. खऱ्या ट्रेकरचे अपघात होत नाहीत असे नाही पण क्वचितच होणारे हे अपघात व त्याचे स्वरूप सोबत असणाऱ्या टीम मुळे कमी होते.
तू १० केले? मी तर २० केले :
मी एका वर्ष्यामध्ये ५० किल्ले केले , २ वर्ष्यामधे ३०० केले असे रेकॉर्ड करणारे आणि सहयाद्रीला बाप ना मानता मीच सर्वांचा बाप असा अंदाज ठेवून तोऱ्यामध्ये वागणारे महाभाग पाहिले कि त्यांचा राग येण्यापेक्षा सहानभूती आणि किवच जास्त येते. २२ वेळा एवरेस्ट सर करणारा कामी रिटा शेर्पा, १४ अष्टहजारी शिखर सर करणारा मिन्ग्मा शेर्पा, जीव लावून दरीमध्ये पडलेले लोक वाचवणारे खरे गिर्यारोहक इतके नम्र होते कि बस, त्या समोर हें अर्ध्या हळकुंडामधील पिवळे काय म्हणावे ? अरे बाबा हिमालय तर अवघड आहेच, पण सहयाद्री हा अख्या महाराष्ट्राचा बाप , छत्रपती शिवाजी महाराजांना स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा, देश वाचवणारा , पापी औरंग्याला २७ वर्ष रगडत ठेऊन महाराष्ट्रभू मध्ये मातीत मिळविणाऱ्या सहयाद्री समोर आपली काय बिशाद? मुक्ताबाई असत्या तर म्हणाल्या असत्या कि गर्व करणारे , तुझ्यापेक्षा मीच भारी सांगणारे , मीच जास्ती किल्ले कमी वेळात केले असे सांगणारे मडके तर पारच कच्चे आहे.
नवं मावळे
महाराजांप्रती असलेल्या प्रेमामुळे भगवा खांद्यावर घेऊन किल्ले आणि पर्वत चढणारे नवं मावळे, श्रमदान करून टाक्या आणि किल्ले साफ करणारे नवं युवक आणि विविध ग्रुप्स ह्यांचे कार्य तसे बघितले तर चांगले आहे मात्र बचाव, गिर्यारोहणाचे तंत्र, प्राथमिक उपचार ह्यांची माहिती आहे का ? अपघात समई काय करावे किंवा अपघात नाही होऊ म्हणून काय करावे हे माहित आहे का? किल्ल्यावरील , तटबंदीवरील झाडे तोडताना मुळे तोडल्यामुळे दगड मोकळे होऊन पूर्ण तटबंदी, दरवाजे कोसळतात हे कोण सांगणार? पुरातत्व विभाग कमजोर नक्कीच आहे मात्र किल्ले संवर्धन आणि डागडुजी हि योग्य पद्धतीनेच केली पाहिजे हें हि खरे . सरकार काही करत नाही, मग आमीच करतो हा उद्रेक त्या मागे आहेच .मात्र एक आहे कि शिवरायांवरील व सहयाद्रीवरील प्रेम हाच सामान दुवा जुन्या जाणत्या ट्रेकर्स व ह्यांच्या मध्ये आहे. ह्यांच्या मधून हि काही चांगले दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक बनू शकतात असा फार विश्वास वाटतो
बरेच नवं मावळे किल्ल्यावर आलेल्या सर्वच कुटुंबाना, मुला मुलीना लफडं समजतात, अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे, हाकलून लावणे हे उद्योग करतात व आवाज उठवल्यास प्रसंगी मारहाण करतात. ठीक आहे फालतू धंदे किल्ल्यावर नको, पण कायदा हातात घायला कोणी सांगितलं? कायदा मोडणाऱ्यांचे हात महाराज कलम करायला सांगत असत मग ? ह्यात एक लक्षात घ्या कि किल्ल्यावर येऊन लफडे करणे, दारू पिणे , भिंतींवर नावे लिहणे , कचरा करणे हे कामे सच्चा गिर्यारोहक कधीच करत नाही , हि कामे तर टुकार पर्यटक आणि मज्जा मारणाऱ्यांची. योग्य शब्दात समजावून सांगितल्यास ही कामे होतात , त्यासाठी दमदाटी ची गरज नाही.
नवीन काय करू शकतो?
किल्ले वाचवतानाच बेसिक, ऍडव्हान्स सारखे कोर्सेस करून सुरक्षित ट्रेक केले पाहिजेत असा विचार किती नवयुवक .करतात ?? अपघात समई आपली मदत व्हावी म्हणून किती जण नवी बचाव तंत्र शिकतात? आपल्या ज्ञानाचा उपयोग समस्त किल्ले प्रेमी मंडळींना मिळावा असा विचार किती जण करतात? असे कित्तेक प्रश्न विचारावे वाटतात मात्र सारासार बुद्धीने विचार ना करता झुंडशाहीला पृरस्क्रुत करणारे बरेच महाभाग विविध ग्रुप मध्ये असल्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? या मध्ये हि काही संस्था मात्र वेगळे कार्य करून, किल्ले साफ ठेऊन आणि स्थानिक लोकांसाठी कार्य करून वेगळा ठसा उमटवत आहेत हि अभिनास्पद बाब.
बचाव दल:
गिरिमित्र, वैनतेय , शिवदुर्ग लोणावळा इत्यादी जुन्या संस्था ह्या सातत्याने चांगले काम करत आहेत व सरकारने आपत्कालीन बचाव करण्यासाठी ह्यांची एक मोट बांधली आहे The Maharashtra Mountaineers Rescue Coordination Center( MMRCC ) ज्या मध्ये ट्रेक, वर्ष विहार करताना अपघात झाल्यास ७६२०२३०२३१ नंबर वर फोन केल्यास सर्वात जवळील टीम येऊन तात्काळ मदत सुरु करते मात्र बऱ्याच लोकांना ह्याची माहिती नाही.
समारोप:
काही वर्ष्या पूर्वी आफ्रिकेमधील एका जंगलामध्ये काही तरुण हत्ती बेफाम झाले आणि सर्व प्राण्यांना जबर त्रास देऊ लागले, तेव्हा एका गेंडयाने प्रमुख नरावर हल्ला करून त्याला त्याची जागा दाखवून दिली मात्र त्याना अक्कल येइना तेव्हा सरकार ने दुसऱ्या जंगलामधील काही तगडे , अनुभवी , वयस्कर हत्ती आणून सोडताच हे तरुण नर गपगुमान राहू लागले आणि जंगलाचे कायदे पळू लागले. ह्याच प्रमाणे महाराष्ट्र मधील प्रमुख संस्था आणि गिर्यारोहक हे बचाव कार्य, ट्रैनिंग देत आहेत मात्र त्येनी व सरकारने ह्या स्वयंघोषित नवं ट्रेकर्सला कानपिचक्या देणेही तितकेच महत्वाचेच आहे असे वाटते, नाहीतर हें ट्रेकिंग च्या नावाखाली धुमाकूळ घालणारे ट्रेकिंग, गिर्यारोहण ह्या नावाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही असे एकेंदरीत चित्र दिसत आहे
-
अंबरीश शिवाजीराव मोरे, संचालक : डेक्कन ट्रॅव्हल कॉर्पोरेशन व एक गिर्यारोहक
१६ जुलै २०१८ ( नावासगट लेख पुढे पाठविल्यास काही हरकत नाही )

Comments
Post a Comment