Angriya Cruise : A New Experience
आंग्रीया क्रूझवरील गोवा ते मुंबई प्रवास अंबरीश मोरे ह्यांच्याकडून : कॅप्टन धोंड आणि पर्यावरण प्रेमी मंडळींनी चालू केलेली आंग्रीया क्रूझ हि , शिंदीया शिपिंग आणि चौघुले शिपिंग ह्या जुन्या काळातील मुंबई - कोकण - गोवा प्रवास केलेल्या लोकांसाठी एक सुंदर आठवण परत एकदा जगण्यासाठी व नवीन पिढी साठी पूर्वापार चालत असलेला समुद्री प्रवास पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी आलेली संधी नक्कीच आहे . ब्रिटिश काळामध्ये कोकण किनार पट्टी मध्ये चालणारे शिंदीया , चौघुले शिपिंग व इतर जहाजे मुंबईची नाळ कोकणाशी जोडून ठेवत होती , कोकणात असलेली चौघुले शिपिंग हि कोकणी माणसाला मुंबई जवळ करण्यासाठी सोइची होती मात्र किनारपट्टीलागत झालेले रस्ते , पूल आणि गाळानी भरणारी बंदरे हि ह्या सेवेला घरघर लावू लागली त्यातच लिट्टे ( तामिळ टायगर्स ) सोबत चालू झालेल्या संघर्षानंतर कोकण किनारपट्टीवर चालणारी तिन्ही जहाजे शासनाकडे वर्ग करण्या आली आणि हि सेवा पूर्णपणे संपली व त्या राहिल्या आठवणी . तरुणपणी गोवा