Angriya Cruise : A New Experience


आंग्रीया क्रूझवरील गोवा ते मुंबई प्रवास अंबरीश मोरे ह्यांच्याकडून  : कॅप्टन  धोंड आणि  पर्यावरण  प्रेमी मंडळींनी  चालू केलेली   आंग्रीया क्रूझ हि, शिंदीया शिपिंग  आणि चौघुले शिपिंग ह्या जुन्या काळातील मुंबई-कोकण-गोवा प्रवास केलेल्या लोकांसाठी एक सुंदर आठवण परत एकदा जगण्यासाठी नवीन पिढी साठी पूर्वापार चालत असलेला समुद्री प्रवास पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी आलेली संधी नक्कीच आहे.
ब्रिटिश काळामध्ये कोकण किनार पट्टी मध्ये चालणारे शिंदीया, चौघुले शिपिंग  इतर जहाजे मुंबईची नाळ कोकणाशी जोडून ठेवत होती, कोकणात असलेली चौघुले शिपिंग हि कोकणी माणसाला मुंबई जवळ करण्यासाठी सोइची होती मात्र किनारपट्टीलागत झालेले रस्ते, पूल आणि गाळानी भरणारी  बंदरे हि ह्या सेवेला घरघर लावू लागली त्यातच लिट्टे ( तामिळ टायगर्स) सोबत चालू झालेल्या संघर्षानंतर कोकण किनारपट्टीवर चालणारी तिन्ही जहाजे शासनाकडे  वर्ग करण्या आली आणि हि सेवा पूर्णपणे संपली त्या राहिल्या आठवणी. 
तरुणपणी गोवा -मुंबई प्रवास ह्या जहाजांमधून केला असल्याकारणाने त्याची मज्जा, डेक वर होणारे स्थानिक संगीताचे कार्यक्रम नाच जे प्रवाशी स्वमनोरंजनासाठी करायचे ते जिंदादिल कॅप्टन धोंड साहेबांच्या मनामध्ये पक्के राहिले होते (हे कॅप्टन साहेब एक वेगळेच  रसायन आहे ज्यांचेकडे लोक आपोआप आकर्षित होतात,  त्यांच्याकडून  एक एक गोष्टी नक्कीच ऐकण्यासारख्या आहेत हा माझा प्रत्यक्ष अनुभव) त्यामुळेच लोकांसाठी अंतर्गत क्रूझ सफारी आनंद लुटण्यासाठी कॅप्टन  धोंड ह्येनी जपानमधील  जलद गतीने प्रवास करणारी क्रूझ म्हणून प्रसिद्ध असलेली  हे जहाज भारतात आणून सुंदर पद्धतीने त्याचे पुनर्निर्माण करून मुंबई-गोवा -मुंबई प्रवासासाठी उपलब्ध करून दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांना आदरांजली म्हणून दिलेले आंग्रीया हे नाव मराठी मनाला सुखावून जाते. कोकण किनारपट्टी वरील मराठी तरुण खलाशी वर्ग जेव्हा आपले स्वागत करतो तेव्हा तर कॅप्टन धोंड ह्यांचे नक्कीच आभार मानावे वाटतात , अर्थातच इतरही प्रांतांमधून आलेला खलाशी आणि अधिकारी वर्गही आपली सर्वोत्तम काळजी घेणाराच आहे. सुखकारक रूम्स बेड्स, सुंदर इन्फिनिटी स्विमिन्ग पूल, सुंदर डेक, लाईव्ह डी.जे, युवा पिढीला मोहात पडणारा जबरदस्त डिस्को , सुंदर जेवण, रात्री डेक वर जमणारी गिटार सोबतची गाण्याची महफिल , डॉल्फिन दिसताच करून कडून मिळणारे संदेश,  ना लागणारे जहाज ( हि क्रूझ  बरीच स्टेबल आहे त्यामुळे समुद्र लागत नाही हि मोठी जमेची बाजू आहे) सर्वच सुंदर आहे.  बंक बेड , आई-वडील मुले ह्यांसाठी वेगळी रूम, १२,१६ ,१८ २० लोकांसाठी मोठी बंक बेड असलेली रूम, लोकांसाठी सुंदर सजावट असलेली रूम अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आपण घेऊ शकतो.  मुंबईवरून सायंकाळी वाजता सुटून सकाळी वाजता आपण मर्गोवा तेथे उतरू शकतो परत सायंकाळी वाजता हि क्रूझ मुंबई साठी निघते  जी सकाळीं वाजता मुंबईला भाऊच्या  धक्क्याला सोडते.  तर एकदा तरी नक्की मुंबई ते गोवा अथवा परत असा प्रवास सर्वानी नक्कीच करावा. जास्ती माहिती साठी बुकिंग साठी संपर्क : अंबरीश मोरे, डेक्कन ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ०९९२३३१६७७४ / ०२५३६६९३७९९

Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap