नाशिकमध्ये सापडला दुर्मिळ गद्धेगळ
नाशिक दिनांक ३० जानेवारी २०२१ : दिवेआगर येथील गद्धेगाळ आजचा दिवस नाशिक मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण नाशिक मध्ये अत्यंत दुर्मिळ व महत्वपूर्ण असा गद्धेगळ शिलालेख नाशिक मधील अभ्यासकांना सापडला आहे . हा शोध अत्यंत महत्वपूर्ण असा असून ह्या मुळे भविष्यात नाशिक शहरात वेगवान व गंभीर घडामोडी होतील असा अंदाज आहे . हा लेख पूर्णतः इतिहास व महाराष्ट्रामध्ये मिळणारे विविध शिलालेख , लेणी , वीरगळ , गद्धेगळ , ह्यांचा अभ्यास करून लिहिला आहे . शिव्या सगळयांना माहित असतात पण काही जण देत नाहीत तर काही जण भरपूर शिव्या देतात . ग्रामीण भागात , झोपडपट्टीमध्ये काही लोकांसाठी शिव्या ह्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो . खालील लेख हा शिवी व तिचे कारण नमूद करतो त्यामुळे अश्लील , घाण, असेकसे असू शकत ? ई बाई शी वैगरे ना म्हणता सदर लेखाचे ऐतिहासिक महत्व समजून घ्या हि विनंती . खालील शब्द हजारो वर्ष्यांपासून दगडावर कोरलेले असून ते आहेतच हे सत्...