नाशिकमध्ये सापडला दुर्मिळ गद्धेगळ

 नाशिक दिनांक ३० जानेवारी २०२१


 दिवेआगर येथील गद्धेगाळ 

आजचा दिवस नाशिक मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण  नाशिक मध्ये अत्यंत दुर्मिळ महत्वपूर्ण असा गद्धेगळ शिलालेख नाशिक मधील अभ्यासकांना सापडला आहे. हा शोध अत्यंत महत्वपूर्ण असा असून ह्या मुळे भविष्यात नाशिक शहरात वेगवान गंभीर घडामोडी होतील असा अंदाज आहे.  

हा लेख पूर्णतः इतिहास महाराष्ट्रामध्ये मिळणारे विविध शिलालेख, लेणी, वीरगळ , गद्धेगळ, ह्यांचा अभ्यास करून लिहिला आहे. शिव्या सगळयांना माहित असतात पण  काही जण देत नाहीत तर काही जण भरपूर शिव्या देतात. ग्रामीण भागात, झोपडपट्टीमध्ये  काही लोकांसाठी शिव्या ह्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो .खालील लेख हा शिवी तिचे कारण नमूद करतो त्यामुळे अश्लील , घाण, असेकसे असू शकत ? ई बाई शी वैगरे ना म्हणता सदर लेखाचे ऐतिहासिक महत्व समजून घ्या हि विनंती. खालील शब्द हजारो वर्ष्यांपासून दगडावर कोरलेले असून ते आहेतच हे सत्य आपण नाकारू शकत नाही.

गद्धेगळ काय आहे ?

गद्धा म्हणजे गाढव आणि गळ म्हणजे दगड

(इंग्रजी = ‘Ass-Curse Stone) असे म्हणतात. हि  एक अत्यंत मानहानीकारक  शिवी  आहे. पूर्वी  राजे  महाराजे  मंदिर  किंवा  किल्ले  ह्यासाठी  जमीन  गाव  / कसबा  ह्याचे  उत्पन्न  दान  करीत   असत  . त्या  दान केलेल्या उत्पन्नाचा  व्यक्ती / समाजाकडून गैरवापर  होऊ  नये  म्हणून दगडावर हा गद्धेगळ कोरत असत.   ह्या दानाचा गैरवापर करणार्यास  ह्यामध्ये शिवी / शापवाणी दिलेली असते. ती शापवाणी किंवा शिवी म्हणजेच  गद्धेगळ.

गद्धेगळ कसा असतो :

उभ्या दगडावर सर्वात वरती चंद्र सूर्य असतात ( चंद्र सूर्य असे पर्यंत हि शापवाणी सत्य होत राहील )  , त्या खाली शापवाणी लिहिलेली असते किंवा नसतेही  त्या खाली गाढव / घोडा हा पोटावर झोपलेल्या स्त्री बरोबर गमन  करताना  कोरलेले असते . ह्या अर्थ असा कि हे दिलेले दान दयायला जो कोणी नाकारेल किंवा त्या दानाचा  दुरुपयोग करेल त्याच्या आईला गाढव किंवा घोडा लागेल . पूर्वी यादव कालीन त्यापूर्वीच्याही गद्धेगळमध्ये  तया माये, गाठोऊ घोडौ झाविजे  ( त्याच्या मायला गाढव, घोडा Xवला ) असे सुद्धा उल्लेख सापडतात . ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते  ते कोरलेल्या आकृत्यांवरून अर्थ समजून घेत असत. ( समझनेवालों को इशारा हि काफी है ) 

 गद्धेगळ महत्वाचा का ?

असे हे गद्धेगळ शिलाहार, यादव काळापासून महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी  दिसतात.  ऐतिहासिक दृष्ट्या हे महत्वाचे असतात कारण जिथे हे मिळतात तिथे पूर्वी एखादी महत्वाची वास्तू / किल्ला / मंदिर असून त्याच्या उत्पन्नासाठी दिले गेलेले दान हे त्यामागील महत्वाचे कारण असे. भंडारदरा येथे रतनवाडीमध्ये अमृतेश्वराचे जवळ असाच एक गद्धेगळ असून त्यावरील अक्षरे पुसट झाली आहेत. ह्यांची संख्या कमी असून हल्लाउंदीर खिलजीच्या आक्रमणानंतर एकतर  मूर्तिभंजकांना ह्या शापवाणी ने काहीही फरक पडत नसावा किंवा धर्मभीरू लोक हि काळानुसार बदलून गेले असावेत त्यामुळे नवीन गद्धेगळ सापडतच नाहीत असे दिसते.

कसा आहे नाशिकचा गद्धेगळ? 

नाशिकच्या गद्धेगळमध्ये वरती चंद्र सूर्य असून मधल्या टप्प्यात खालील लेख लिहिलेला आहे  :- ' भ्रस्टाचारी राजकारणी व अधिकारी व फुकात होरडींग लावोन कसबा खराब करीनाऱ्या मातृगमनिकाच्या मायेला गाढू लागो '. असे शुद्ध देवनागरी मध्ये लिहिलेले असून, त्याखाली नेहेमीप्रमाणे झोपलेल्या स्त्रीसोबत गाढव गमन करत आहे असे शिल्प असून महत्वाचे म्हणजे दुसरे गाढव मागे वाट पाहत आहे असे त्या शिल्पात दिसते. अशाप्रकारचा हा एकमेवाद्वितीय गद्धेगळ असून ह्यावरील तारीख पुसट झाली झाली आहे नीट दिसत नाही , मात्र हा फारच नवीन काळामधील गद्धेगळ असावा असे वाटते.

नाशिकचा गद्धेगळ काय म्हणतो ?

हा एक अत्यंत नवा, दुर्मिळ गद्धेगळ असून ह्यामध्ये समाजाचा राज्य चालविणारे लोकांबद्दलचा नवीन विचार दिसतो. हा अत्यंत क्रांतिकारी गद्धेगाळ असून सर्वसामान्य लोकांचा राज्यकर्ते वे अधिकारी ह्यां बद्दल दृष्टिकोन दिसून येतो. हा राज्याने लोकांना दिलेला नसून लोकांनी राजकारभार हाकणाऱ्या इसमांसाठी हा गद्धेगळ बनविला असावा असे दिसते. लोकांनी चालवायला दिलेले राज्य नीट चालवा नाही तर आमची शापवाणी चंद्र सूर्य असे पर्यंत चालू राहील असे जनता अधिकारी व राजकारणी ह्यांना सांगत असावी असे दिसते. ह्या नवीन शोधलेल्या गद्धेगळामुळे ,प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी आणि राजकारणी ह्यांना शापवाणीमुळे काही एक फरक पडणार नसून , नीट काम ना करणारे अधिकारी व नेते ह्यांच्यापुढे मात्र, आता काय असा प्रश्न उभा नक्कीच राहू शकतो.
(सध्या कितीएक राजकारणी अधिकारी स्त्रियापण भयानक भ्रष्ट्राचार करतात त्यांना मातृगमनिक हि शिवी कशी लागू होईल हा कळीचा मुद्दा आहे )

 पुढे काय ?

 ह्या गद्धेगळामुळं खळबळ उडणार असल्याकारणाने सदर दगड हा लपवून ठेवला असून  नंतर काळ वेळ पाहून मूळ दगड त्याचे नक्कल बनवून, परवानगी मिळाली तर मूळ गद्धेगळ दगड जिल्लाधिकारी कार्यालय, इतर अनुक्रमे महानगरपालिका मुख्य इमारत जिल्ला परिषद भवन येथे लावण्यात येईल असा मनसुबा इतिहास प्रेमीनी व्यक्त केला आहे.

पूर्ण लेख परत एकदा वाचा व आपण हा लेख परवानगीची वाट ना पाहता फक्त नाशिक काढून आपल्या गावाचे / शहराचे नाव टाकून पुढे नक्की पाठवू शकता.  लेखकाचे नाव काढून टाकले तरी चालेल पण संदेश पुढे गेलाच  पाहिजे 

Thats  All  Folks . ये सब झूट  है पर फीलिंग्स सच्ची है

 

अंबरीश मोरे , नाशिक 

 शब्दांचे अर्थ :

कसबा : मोठे गाव ,

गमन करणे : लैंगिक संबंध करणे

मातृगमनिक : स्वतःच्या जन्मदात्री बरोबर लैंगिक कृत्य करणारा, ह्याला मराठी मध्ये एक फारच घाण शिवी आहे.  

ता.क. : -ह्या गद्धेगळामुळे नाशिक जिल्ह्यातुन सर्व गाढव हाकलुन द्यावेत असा प्रयत्न काही घाबरलेले अधिकारी व नेते करीत आहेत असे समजते. तसेच त्या गद्धेगाळ लेखावरील तारिख बहुधा २६ जानेवारी १९५० असावी असे वाटते. याच दिवशी देश प्रजासत्ताक झाला होता व जनता हीच देशाची खरी मालक आहे बहुधा हीच आठवण राज्यकर्त्यांना राहावी म्हणुन या गद्धेगाळवरील लेखाचे प्रयोजन असावे असे वाटते.

नवीन सापडलेला गद्धेगाळ लपवून ठेवला असल्याकारणाने, वाचकांना गद्धेगाळ कसा असतो हे समजण्यासाठी एका दुसऱ्या गधेगाळाचा फोटो देत आहोत. ( दोन्ही फोटो गूगल साभार) 

 


Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap