एक निव्वळ हास्यास्पद काल्पनिक कथा.

एक निव्वळ हास्यास्पद काल्पनिक कथा.

😂 वैज्ञानिक इशारा : खालील संवाद हा पूर्णपणे काल्पनिक असून कुठे पण जर चुकून माकून संबंध लावायचा प्रयत्न बिलकुल करू नये. ह्यातील सर्व व्यक्ती काल्पनिक असून कुठे असे व्यक्ती खरंच असतील तर निव्वळ योगायोग समजावा. आमची जबाबदारी नाही .वडाची पाने पिंपळाला जोडणाऱ्यास करोनाग्रस्त भागात सेवा करायला पाठविण्यात येईल .

मुलगा : आयव्ह ती पोरं मला आणि माझ्या मित्रांना लै चिडविट्यात आणि टॉल का काय ते करत्यात. म्या शाळेत जाणार नाय. म्या आन माझ मित्र काय बी बोलले कि समदे हसत्यात. काय काय बोलत्यात काकडी ,भोपळ्या , गुलाब , बोबड्या , टकल्या काय अन काय. आमाला तर वाटत कि दुसऱ्या शाळेची पोर सोबत घेऊन आन त्याना गोळ्या चॉकलेटी देऊन ह्ये त्यांनाबी आमच्यावर हसायाला लावत्यात .

आई : आरे तू काय लै गुणांचा हैस का र ? ४ -५ वर्ष्यापुर्वी तू आणि तुझं मित्र हेच बी हेच धंदे करत होतात नाय का , ह्यो तुमचीच आयडिया नाय का ?

मुलगा : पर आता समोरचे लैच चिडवत्यात, आणि ज्यांना आमी तरास द्याचो त्ये हेय नाहीत, हे तर वर्गातले गरीब पोर हायत, पहिले कुनायच्या अध्यात मध्यात नसायचे पर बहुतेक आमचा आगाऊपणा पाहून वैतागले वाटत . आता रोज रोज आमचीच कॉपी करत्यात आणि आम्हाला रडू अंत्यात , माह्या एका मित्रांन तर वर्गशिक्षक सरांकडे तक्रार बी केली है.

आई : @# बशीवल तुझ , बाहेर वातावरण काय आन तुम्ही वागता काय , मग समदे तुम्हाला हसणार नाई तर काय गालगुचे घेणार का? आन शांत बसला तर टोल का काय ते कायला करतील ते तुमाला ? आन जर काय बाय भित्तीवर लिवता तर उत्तर आल तर राग ना येऊ द्याची तयारी ठेवा कि. परीक्षा चालू असताना आन कडक इंस्पेक्षण चालू असताना तुम्ही अश्या बाकी पोऱयांच्या आणि शाळेच्या काड्या करता शोभत का तुम्हाला ? सुरुवात कुणी केले र माझ्या राजा ? आन सारखा सारखा काय ते त्या एकाच गुरुजीला जाऊन भेटता?

मुलगा : (रडत रडत) तू बी त्यांचीच बाजू घेतीस, आता म्या हेडमास्तर कडे तक्रार करणार हाय , ह्यो जुलूम हाय . मी तक्रार करिन , पुना करिन , पुना पुना करिन .

आई (डोक्याला हात लावून) : तू आन तुझं मित्र काय सुधारत नाई आणि तक्रार केली तर काय लिहिणार कि समोरचे आमाला चिडविट्यात आन आम्हीच काकडी, भोपळ्या , गुलाब , बोबड्या हाय म्हणून ? येड्यानो तो तुमचा मित्र बघा, आपल्याच गावचा हाय, तुमच्याच ग्रुप मध्ये असतो पण कसा कमी बोलतो आणि कामाचा बोलतो त्याला कुणी चिडवत का रे कधी? उलट लै इज्जत देत्यात त्याला समदे जन, शिका काय तरी त्याच्याकडंन, त्या दुसऱ्या ग्रुप मधली पोरं बी लय मानतात त्याला . कस येळ काळ परसंग बगुन बोलावं वागावं हे कळंना का रे तुम्हाला एव्हडं मोट होऊन ? वर्गाची मॉनिटरशिप गेली म्हणून हे धंदे कराव काय रे ? ते पण परीक्षा चालू असताना आन कडक इंस्पेक्षण असताना ?

मुलगा : ते मला माहित नाही, लांब लांबची छोटी छोटी मुल आन नवीन नवीन वर्गात आलेली मुल बी मला आता सपोर्ट करून राहिलीत , जर हेड मास्टर सरानी माही कॉम्प्लिन नाय घेतली तर म्या संस्थाचालक , डेपोटी नाई तर आजून वर जाईल , पुना जाईल पुना पुना जाईल.

आई: बर बाबा बस खेळत, पर त्यापरीस तू आणि तुझे दोस्त लोक शाहण्यासारखा वागले तर कोण हसलं सांग बर ? पर तुला एव्हडं कळलं तर वरचा देवच खाली येईल ना. जा बाबा तुही कॉम्प्लिन घेऊन कुट बी. पन माह्याकडे येऊ नको परत परत परत
................................................................................................................................................................................................आणि मुलगा आणि त्याचे मित्र रोज नवीन नवीन ठिकाणी कॉम्प्लिन घेऊन जाऊन राहिले आहेत.
---------------------------------------------------------------------------------
कहानी तो बाकी है मेरे दोस्त
त्या मुलाची आई : तर बाकी सर्व मुलं मुलींनो परीक्षा चालू असताना , कडक इन्स्पेकशन चालू असताना सर्व वर्गातील सर्व विविध ग्रुप मधील सर्व मुलं मुलींनी शाळा आणि शिक्षकांना मदत करा, ना कि त्रास द्या हि विनंती.

गोष्ट संपली

लॉक डाउन चालू आहे त्यामुळे भरपूर हसा आणि टेन्शन घालवा.

(भारतीय संविधनातील कलमानुसार लेखन,वाचन ,विचार व्यक्त करणे हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे.तुमच्यात चांगला लेखक असेल तर वेग- वेगळे विषय घेऊन नक्की लिहिते व्हा ) फोटो इंटरनेट वरून साभार घेतला आहे.फोटो आणि आपली काल्पनिक गोष्ट ह्याचा संबंध नाही. शाळकरी मुलांचा ग्रुप फोटो आहे तो फक्त.
-अंबरीश मोरे

Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap