किल्ले त्रिंबकगडावरील चिलखती बुरुज आणि दरवाजा:
किल्ले त्रिंबकगडावरील चिलखती बुरुज आणि दरवाजा: 27 December 2020 प्रचंड मोठा घेरा आणि बाले किल्ला असलेला नाशिक मधील प्रमुख किल्ला म्हणजे किल्ले त्रिंबक / ब्रह्मगिरी. यादव, बहामनी, निजामशाही, मुघल ,मराठा काळातही ह्या किल्ल्यावरून मोठे झगडे झालेले दिसतात. राजे शहाजी ह्यांच्याकडे पण हा किल्ला काही काळापुरता होता. किल्ला ताब्यात तर नाशिक प्रांत ताब्यात असे सोप्पे गणित त्या वेळी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे, रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना नाशिक व बागलाण जिंकायला पाठवले त्यात हा किल्ला जिंकला गेला. नानासाहेब पेशव्याच्या काळात ह्या किल्ल्यावरून निजाम आणि पेशवे ह्यांच्यात बरीच खड खड झाली होती मात्र हा किल्ला १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिला. १८१८ मध्ये ब्रिटीशानी ५-६ दिवसाच्या झगड्यानंतर आणि हत्ती दरवाज्याजवळ ७ ते ८ गोरे अधिकारी बळी देऊन हा किल्ला जिंकला होता. ( इतके सारे गोरे एकदाच मेले त्यामुळे पार ब्रिटिश संसदेपर्यंत हा विषय गेला होता). तदनंतर किल्ला बेवसाऊ झाला. दक्षिण गंगा, गोदावरी चे उगम स्थान असल्याकारणाने भाविक काही प्रमाणात जात असत. ...