थळघाटाचा रखवालदार बळवंतगड.:
12th December 2020
बरेच ट्रेकर मोठेमोठे ट्रेक करतात मात्र यात छोटे किल्ले राहुन जातात , असाच ऐक पिटुकला टेहळणी किल्ला म्हणजे बळवंतगड.
पुर्वी थळ घाट ( आताचा कसारा) लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठिकाणी याची निर्मिती केली गेली. पुर्वीचा ठाणे शहापुर मार्गाने जाणारा रस्ता याच किल्ल्याच्या रक्षणाखाली होता. हाच रस्ता पुढे नाशिक, संगमनेर व किल्ल्याखालुनच दुसरा रस्ता जव्हार, मोखाडाला जातो. यालाच पुढे पेठचा फाटा लागतो जो गुजरातचा व्यापार मार्ग होता.
किल्ला सातवाहन कालीन असण्याची दाट शक्यता वाटते कारण याच मार्गावर पुढे पांडवलेणी आहेत. सध्या याला ऊत्तरेकडुन डांबरी रस्ता असल्याने फक्त १० मिनिटात किल्ला गाठता येतो. ३-४ वाडे/ घरांचे पायाचे अवशेष, बुजलेले टाके, मोडके मंदीर ही किल्लाची सद्यसंपत्ती. मुख्यदरवाजा हा दक्षिणेकडे असावा असे वाटते (बुजलेला आहे)
यावरून स्वच्छ हवामान असल्यास माहुली पर्यंतचा परिसर टप्प्यात येतो तर ऊत्तरेकडे भैरोबाचे माळरान व काही प्रमाणात त्रिंगलवाडी परिसर दिसु शकतो. गुप्तधनापाई खोदलेले खड्डेही बरेच आहेत. आताही कसारा रस्ता व लोहमार्ग टप्प्यात आहे.
येथील वाघ ५०.च्या दशकात संपले व ससे, कोल्हे सोडले तर बिबटे , तरस पण नाहीत. एकंदरीत पुढील काही वर्षात ऊर्वरीत जंगलाचा सुपडा साफ होणार हे नक्की. वन विभागाचा विजय असो.
याच्यापुढेच ऊल्कापाताने बनलेले भैरोबाचे विस्तीर्ण पठार आहे मात्र त्याची माहीती नंतर कधी तरी.
येताना जर कसारा मार्गाने आले तर ब्रिटिशांनी थळ घाटाचे काम चालु असतांना मजुरांसाठी बांधलेली बारामाही पाणी असलेली टोपली विहीरही पाहता येते. ( ही अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विहीर नाही याची नोंद घ्यावी )
Comments
Post a Comment