Posts

Showing posts from 2020

किल्ले त्रिंबकगडावरील चिलखती बुरुज आणि दरवाजा:

Image
  किल्ले त्रिंबकगडावरील चिलखती बुरुज आणि दरवाजा:   27 December 2020  प्रचंड मोठा घेरा आणि बाले किल्ला असलेला नाशिक मधील प्रमुख किल्ला म्हणजे किल्ले त्रिंबक / ब्रह्मगिरी. यादव, बहामनी, निजामशाही, मुघल ,मराठा काळातही ह्या किल्ल्यावरून मोठे झगडे झालेले दिसतात. राजे शहाजी ह्यांच्याकडे पण हा किल्ला काही काळापुरता होता. किल्ला ताब्यात तर नाशिक प्रांत ताब्यात असे सोप्पे गणित त्या वेळी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे, रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना नाशिक व बागलाण जिंकायला पाठवले त्यात हा किल्ला जिंकला गेला. नानासाहेब पेशव्याच्या काळात ह्या किल्ल्यावरून निजाम आणि पेशवे ह्यांच्यात बरीच खड खड झाली होती मात्र हा किल्ला १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिला.     १८१८ मध्ये ब्रिटीशानी ५-६ दिवसाच्या झगड्यानंतर आणि हत्ती दरवाज्याजवळ ७ ते ८ गोरे अधिकारी बळी देऊन हा किल्ला जिंकला होता. ( इतके सारे गोरे एकदाच मेले त्यामुळे पार ब्रिटिश संसदेपर्यंत हा विषय गेला होता). तदनंतर किल्ला बेवसाऊ झाला. दक्षिण गंगा, गोदावरी चे उगम स्थान असल्याकारणाने भाविक काही प्रमाणात जात असत. नंतर १९ व्या शतकाच्या सु

सरहद्दीचा शिलेदार : किल्ले भूपतगड

Image
21 December 2020    सरहद्दीचा शिलेदार : किल्ले भूपतगड   लहानपण छोट्या गावात गेल्यामुळे माळरान आमराई, जंगली गवत ह्याचा एक विशिष्ट वास नेहेमीच डोक्यात राहिला होता. नंतर शहरात आल्यामुळे तो अनुभव नंतर आला नाही मात्र किल्ले भूपतगडाने बालपणाच्या आठवणी जाग्या केल्या. तत्कालीन जव्हार संस्थान आणि मराठी साम्राज्य ह्यांच्या सरहद्दीवर असलेला व शेवटपर्यंत जव्हार संस्थानाच्या अधिपत्याखाली असलेला हा भूपतगड.     ३ -४ टाक्यांचा समूह, ३ -४ फूट उंचीच्या शिल्लक भिंती ज्या जवळपण ६ ते ८ फूट रुंद आहेत असा किल्लेदाराचा वाडा, अर्धवट कोरलेली जांभ्या दगडातील विहीर, २ मोडके दरवाजे , बुरुज आणि पडीक भिंती हा किल्ल्याचा संसार. मात्र संपूर्ण किल्ला हा एक सुंदर गवताचा गंध घेऊन आहे. वन विभागाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता केला आहे( झाडे लावणे , मोठे करणे, जुनी झाडे आणि प्राणी वाचवणे हे सोडून वन विभाग सर्व धंधे करते हा माझा समज आता ठाम होत् चालला आहे). मात्र ह्याची सर्वात खास बात म्हणजे दिसणारा नजारा आणि बाजूच्या डोंगर रांगा , सर्व शब्दापलीकडील अनुभव. दुपारी जेवण झाल्यावर दिसणारा नजारा आणि थंड झुळूका आणि हिवाळ्याती

थळघाटाचा रखवालदार बळवंतगड.:

Image
 12th December 2020  थळघाटाचा रखवालदार बळवंतगड.:    बरेच ट्रेकर मोठेमोठे ट्रेक करतात मात्र यात छोटे किल्ले राहुन जातात , असाच ऐक पिटुकला टेहळणी किल्ला म्हणजे बळवंतगड. पुर्वी थळ घाट ( आताचा कसारा) लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठिकाणी याची निर्मिती केली गेली. पुर्वीचा ठाणे शहापुर मार्गाने जाणारा रस्ता याच किल्ल्याच्या रक्षणाखाली होता. हाच रस्ता पुढे नाशिक, संगमनेर व किल्ल्याखालुनच दुसरा रस्ता जव्हार, मोखाडाला जातो. यालाच पुढे पेठचा फाटा लागतो जो गुजरातचा व्यापार मार्ग होता.   किल्ला सातवाहन कालीन असण्याची दाट शक्यता वाटते कारण याच मार्गावर पुढे पांडवलेणी आहेत. सध्या याला ऊत्तरेकडुन डांबरी रस्ता असल्याने फक्त १० मिनिटात किल्ला गाठता येतो. ३-४ वाडे/ घरांचे पायाचे अवशेष, बुजलेले टाके, मोडके मंदीर ही किल्लाची सद्यसंपत्ती. मुख्यदरवाजा हा दक्षिणेकडे असावा असे वाटते (बुजलेला आहे) यावरून स्वच्छ हवामान असल्यास माहुली पर्यंतचा परिसर टप्प्यात येतो तर ऊत्तरेकडे भैरोबाचे माळरान व काही प्रमाणात त्रिंगलवाडी परिसर दिसु शकतो. गुप्तधनापाई खोदलेले खड्डेही बरेच आहेत. आताही कसारा रस्ता व लोहमार्ग टप्

Fort Khairai :

Image
  Fort Khairai : 7th December 2020 First Trek after Lockdown with old team mates of Vainateya but with new generation excellent team leaders. Fort Khairai. A fort on the boundary of Maratha Empire and Mughals in the era of Chhatrapati Shivaji Maharaj. Koli King of Jawahar, Marathas and Mughals had owned it. No actual history available.    It his having destroyed Bastion's and walls. 2 water tanks and 1 well. 2 destroyed canons. It is having strategic important location to keep control on the old trading routes. Beautiful surrounding and views. Peth and Harsul are Kashmir of Maharashtra but with very bad and narrow roads. ( Speciality of Public works department of Maharashtra). All Photos by fellow trekkers.

एक निव्वळ हास्यास्पद काल्पनिक कथा.

Image
एक निव्वळ हास्यास्पद काल्पनिक कथा. 😂 वैज्ञानिक इशारा : खालील संवाद हा पूर्णपणे काल्पनिक असून कुठे पण जर चुकून माकून संबंध लावायचा प्रयत्न बिलकुल करू नये. ह्यातील सर्व व्यक्ती काल्पनिक असून कुठे असे व्यक्ती खरंच असतील तर निव्वळ योगायोग समजावा. आमची जबाबदारी नाही .वडाची पाने पिंपळाला जोडणाऱ्यास करोनाग्रस्त भागात सेवा करायला पाठविण्यात येईल . मुलगा : आयव्ह ती पोरं मला आणि माझ्या मित्रांना लै चिडविट्यात आणि टॉल का काय ते करत्यात. म्या शाळेत जाणार नाय. म्या आन माझ मित्र काय बी बोलले कि समदे हसत्यात. काय काय बोलत्यात काकडी ,भोपळ्या , गुलाब , बोबड्या , टकल्या काय अन काय. आमाला तर वाटत कि दुसऱ्या शाळेची पोर सोबत घेऊन आन त्याना गोळ्या चॉकलेटी देऊन ह्ये त्यांनाबी आमच्यावर हसायाला लावत्यात . आई : आरे तू काय लै गुणांचा हैस का र ? ४ -५ वर्ष्यापुर्वी तू आणि तुझं मित्र हेच बी हेच धंदे करत होतात नाय का , ह्यो तुमचीच आयडिया नाय का ? मुलगा : पर आता समोरचे लैच चिडवत्यात, आणि ज्यांना आमी तरास द्याचो त्ये हेय नाहीत, हे तर वर्गातले गरीब पोर हायत, पहिले कुनायच्या अध्यात मध्