रांडा असता तर निदान कामास तरी आला असता
किल्ले ब्रह्मगिरी भाग २ : भू माफिया : मग आता आम्ही काय करायचे ? आमचे लोकप्रिय नेते , राजकारणी , चमको कार्यकर्ते हे ह्या आणि सर्वच ठिकाणच्या जमिनीच्या प्रश्नावर का बोलत नाहीत ? चांदा ते बांदा सर्व महाराष्ट्र सगळीकडे टेकड्या , डोंगर , वने ओरबाडायचे काम चालू आहे . ब्रह्मगिरी हा तर ह्या लढाईचा पहिला टप्पा आहे , बाकी सगळीकडच्या गड , किल्ले , डोंगर , दर्या , गायराने व त्याला बिलगलेले रक्त पिणारे जळू रुपी भू माफिया हे तर हळू हळू रडार वर येतीलच . पण असे का कि फक्त पर्यावरण वाचवा म्हणणारे ह्यात उतरत आहेत , हे आमचे प्राणप्रिय सतत पोस्टर वर झळकणारे राजकारणी गप्प का बसले आहेत ? कारण काळा पैसा हि ह्यांचा , माज पण ह्यांचा , अधिकारी पण ह्यांच्या खिशातील , हेच भू माफिया किंवा त्यांचे छुपे पार्टनर . एक हि जण तोंड उघडणार नाही बघा . हे एवढ्या दिवसात पहिलेच असेल . ओन्ली इनकमिंग नो आउटगोइंग . असाच एक किस्सा वाचा : & अंजनवेल / गोपाळगड ह्या किल्ल्यावरील किल्लेदा...