रांडा असता तर निदान कामास तरी आला असता
किल्ले ब्रह्मगिरी भाग २: भू माफिया :
मग आता आम्ही
काय करायचे ? आमचे
लोकप्रिय नेते, राजकारणी, चमको
कार्यकर्ते हे ह्या
आणि सर्वच ठिकाणच्या
जमिनीच्या प्रश्नावर का बोलत
नाहीत ? चांदा ते बांदा
सर्व महाराष्ट्र सगळीकडे
टेकड्या, डोंगर, वने ओरबाडायचे
काम चालू आहे
. ब्रह्मगिरी हा तर
ह्या लढाईचा पहिला
टप्पा आहे, बाकी
सगळीकडच्या गड , किल्ले
, डोंगर , दर्या, गायराने व
त्याला बिलगलेले रक्त पिणारे
जळू रुपी भू
माफिया हे तर
हळू हळू रडार
वर येतीलच.
पण असे का
कि फक्त पर्यावरण
वाचवा म्हणणारे ह्यात
उतरत आहेत, हे
आमचे प्राणप्रिय सतत
पोस्टर वर झळकणारे
राजकारणी गप्प का
बसले आहेत?
कारण काळा पैसा
हि ह्यांचा, माज
पण ह्यांचा, अधिकारी
पण ह्यांच्या खिशातील,
हेच भू माफिया
किंवा त्यांचे छुपे
पार्टनर. एक हि
जण तोंड उघडणार
नाही बघा. हे
एवढ्या दिवसात पहिलेच असेल
. ओन्ली इनकमिंग नो आउटगोइंग.
असाच एक किस्सा
वाचा :
& अंजनवेल / गोपाळगड ह्या किल्ल्यावरील
किल्लेदाराने १२०० सैन्यबळ
असूनही हबशींविरुद्ध माघार घेतली. हि
बातमी छत्रपती शाहूंचे
प्रधान बाजीराव पहिले ह्यांना
कळताच त्यांनी किल्लेदाराला
तातडीने पत्र रवाना
केले ज्यात लिहिले
होते कि ' बाराशे
माणूस असता प्रतिकार
केला नाहीत .. अचंबा
वाटल्याशिवाय राहिला नाही ... रांडा
असता तर निदान
कामास तरी आला
असता.'
तोच किल्ले त्रंबक
जो मराठेशाही पेशवाई
संपली, कुठूनही मदत मिळणार
नाही हे माहित
असूनही ५/६
दिवस लढला व
शेवटी अत्यंत नाईलाजाने
इंग्रजांच्या अधीन झाला
त्याची आजची अवस्था
बघवत नाही.’ महाराज
तुम्ही परत या’
म्हणून इवळणारे हे विसरतात
कि रयतेच्या तोड्याला
हि हात लावू
नये आणि किल्ल्याखालील
एकही झाडाला हात
लावू नये हि
प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची
शिकवण आहे व
सर्व राजकारणी ती
सोयीस्कररित्या विसरतात. पण निवडणूक
आली कि महाराजांसारखे
रयतेचे राज्य लोकांना देऊ
असे बिनधास्त ठोकत
असतात.
प्रशासन हाताशी असूनही भ्रष्टाचार
करणारे व अशी
कामे न थांबवणारे
सरकारी अधिकारी तसेच ताकत,
संख्याबळ असूनही आवाज न
उठवणारे, प्रतिकार ना करणारे
नागरिक ह्यांना आज परत
हेच म्हणावे वाटते
कि रांडा असता
तर निदान कामास
तरी आला असता.
एका चित्रपटात एका
अधिकार्याला ऊद्देशुन एक गहिऱ्या
अर्थाचे वाक्य होते : :साहीबो
तवायफ तो सिर्फ
अपना जिस्म बेचती
है, आप तो
आपका इमान बेचते
हो. त्यावर मी
पुढे म्हणीन कि
: आप तो जिस्म
के साथ खुदका
इमान, रुह और
खुद्दारी भी बेच
चुके हो. खरंच
हे असले राजकारणी
आणि भू माफिया
हे ह्या पेक्षाही खालचे आहेत.
भ्रष्ट अधिकाऱ्यांचा नंबर तुमीच
लावा (नाईलाजाने किंवा फसवून
आणून ह्या धंद्यात
आलेल्या सर्व वेश्यांची
/ सेक्सवर्कर यांची माफी आधीच
मागतो )
हे थांबवायचे असेल तर
उपाय एकच : अँटी
फार्म हाऊस ऍक्ट
व त्याच बरोबर
मोक्का,पोस्को, गुंडा ऍक्ट
या सारखाच ' भू
माफिया कायदा' आणलाच गेला
पाहिजे. ( वाळू माफिया
हे पण ह्यातच
येतील) सर्वानी मागितला तर
नक्की येईल बघा.
फक्त गम्मत बघणार
असाल, मी काय
करू, मला त्रास
थोडीच होतो आहे,
मला होईल तेव्हा
मी पाहिलं असे
म्हणुन ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने
ओरडत बसणार असाल
तर:------> रांडा असता तर
निदान कामास तरी
आला असता.
अंबरीष मोरे . ०१/ ०६/२०२१
Comments
Post a Comment