Posts

Showing posts from November, 2021

Fort Achala :

Image
Fort Achala : (4040 feet. Base village Pimpri Anchala). A rough forest road takes us at the base of the fort. Its semi complete road and once done, max forest will be gone as saw huge tree cutting on the way to the fort. Fort Achala is an old fort and was mainly used as a watch station. In the time of Chh. Shivaji maharaj it was won by Maratha army and was under Maratha rule till the nearest biggest fort Ahiwantgad got won by Mughals in 1676. It again came under Maratha power in 1754 till won by the British in 1818. The details show it must a fort from Satvahan time. 7 to 8 destroyed houses , 9 water tanks with 3 tanks having water and very few other ruins can be seen on it. Toulya, Hatgad, Ahiwant, Wani, were visible today from it. On the way to trek we saw temple in Ahiwantwadi which is having very old stone pillers. When asked people told us that they got it from another village which is behind the mountian. Overall good trek in good hot season. AND don't forgot to watc

भग्न मंदिरांचे बिलवाडी :

Image
रविवारी अहिवंत गडाच्या ट्रेक नंतर तेथून साडेतीन किलोमीटरवर असलेल्या बिलवाडी येथील अत्यंत जुन्या अशा मंदिरांना आम्ही भेट दिली. आमचे ट्रेकर मित्र श्री प्रशांत परदेशी यांनी मागील वर्षी सातमाळा रेंज ट्रेक केला होता तेव्हा सुरगाणा तालुक्यात हरण बारी जवळ त्यांना एक नवीन बांधलेले मंदिर आढळले. त्याचे खांब हे अत्यंत जुन्या पद्धतीचे होते छताला आधार देणारे यक्ष जमिनीत गाडले होते तर जमिनीतील राक्षस छतावर लावलेले होते. त्यांनी कुतुहलाने विचारले असता जवळच बिलवाडी येथे खूप पडकी मंदिरे असून ज्याला लागेल तो ट्रॅक्टर भरून नक्षीदार दगडी घेऊन येतो असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांना आत्यंतिक धक्का बसल्याने त्यांनी सदर मंदिराला भेट दिली असता अत्यंत वाईट अवस्थेतील मंदिरे त्यांना दिसली. म्हणूनच त्यांनी आवर्जून ट्रेक नंतर मंदिरांना भेट द्या असे आम्हाला सांगितले होते. दमलेले असूनही सर्वजण मंदिराकडे रवाना झालो. शासनाने? नुकताच मंदिरापर्यंत रस्ता बनवायचे काम हाती घेतलेले आहे, तेही अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने. की ज्यात रस्ता हा थेट मंदिराला लागूनच काढलेला आहे. तसेच रस्त्यात येणारी प्रचंड मोठी झाडे ही विनापरवाना तोडल

फुलपाखरांचा किल्ला अहिवंत गड:

Image
नाशिक पासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावरती सप्तशृंगी गडाच्या अगदी समोर जो प्रचंड विस्ताराचा डोंगर दिसतो तोच आहे किल्ले अहिवंत गड. ईखारा, धोडप ,मार्कंडेय, सप्तशृंगी गड, अहिवंत गड, अचला ही एक किल्ल्यांची लाईनच आहे जि पुर्वीच्या व्यापार रस्त्यांची सुरक्षितता ठेवत असे. सदर किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापासून असून तेव्हापासूनच हे किल्ले उपयोगात असावेत असे दिसते. सप्तशृंगी गडाकडे न वळता डावीकडे दरेगावकडे वळताच एक नवीन रस्ता दरे गाव ते बिलवाडी असा डोंगर फोडून झालेला आहे. ह्या रस्त्याने गेल्यास किल्ल्याच्या पोटाला गाडी लावता येते व तेथून किल्ल्याच्या पोटातुनच एक रस्ता हा मुख्य दरवाज्याकडे जातो. प्रचंड झाडी व पुढे आलेल्या डोंगरामुळे शेवटपर्यंत किल्ल्याचा प्रवेश कुठे आहे हे समजून येत नाही. हा किल्ला यादव, बहामनी, आदिलशाही, मोगल ,मराठे परत मोगल व नंतर परत मराठेशाहीत आला अशा नोंदी सापडतात. सुरतेच्या स्वारी आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना नाशिक व बागलाण वर पाठवून एकाच धडाक्यात सर्व किल्ले जिंकून घेतले होते त्यातच हा गडही होता. मात्र एकच वर्षाने मोगलांच्या जवळपास चाळीस हजार सैन्या

*सरदारा*

Image
सत्य कथा. गोष्ट असेल १९९०-९१ ची. मी त्यावेळी सहावीमध्ये असेन. नवीनच बांधलेल्या आमच्या बिल्डिंगमध्ये एक सरदार राहायला आले .गोरेपान पावणेसहा फूट उंच, शांत चेहरा. आपण हसलो तर हसणार नाहीतर निर्मळ चेहेर्याने समोरून निघुन जाणार. त्याच्या चेहर्याभोवती ऐक गुढ वलय होते.नवीनच रहायला गेल्याने अजून एकमेकांशी नीट कोणाशीच ओळख झालेली नव्हती मात्र सरदारजींचे ईंपोर्ट केलेल्या वस्तुंचे दुकान होते असे समजले. हळूहळू बिल्डिंग मधील लोक ऐकमेकांना ओळखु लागले. पण सरदारजी ऐकटेच राहतात हे सोडुन त्यांच्याबद्दल बाकी काहीही माहीती नव्हती. आम्ही लहान मुले त्यांना नमस्ते अंकल जी असे म्हणत असू व उत्तरा देखील ते एक मंद स्मित करून पुढे निघुन जात असत. आम्ही मुलांनी लवकरच त्यांचे छोटेसे दुकान शोधून काढलं यामध्ये आम्हाला अप्रूप वाटणार्या व त्या काळी सहसा न मिळणाऱ्या इम्पोर्टेड वस्तूंची रेलचेल होती. आम्ही मुद्दाम त्यांच्या दुकानासमोरून सायकलने जाता जाता त्यांना हात देऊन व लांबूनच नमस्ते अंकलजी असे ओरडून पुढे जात असू व तेही आम्हाला शांततेत हसून हात देत असत. महिन्या-दोन महिन्यात कधीतरी त्यांचा एक पुतण्या त्यांना भेटायला य

साल्हेरची लढाई व कवी भूषण

Image
  " साल्हेरची लढाई व कवी भूषण "    मराठ्यांनी १६७० मध्ये बागलाणात हातपाय पसरण्यास सुरुवात केली . बागलाणचा मुख्य किल्ला साल्हेर जिंकून औरंगजेबाच्या जखमेवर मीठच चोळले गेले . त्यामुळे त्याने आपला दूध भाऊ बहादूरखान कोका ( कोकलताश ) ह्याला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले त्याचा इख्लासखान मियाना हा मुख्य लढाऊ इसम होता       ( औरंगजेब तरुण असताना दक्खनच्या सुभेदारीवर होता व त्यामुळेच साल्हेर चे महत्व जाणून होता )   . मराठ्यांच्या   इतिहासात   1671 ची साल्हेर ची   लढाई   हि   फारच   महत्वाची   आहे   . पहिल्यान्दाच   मुघल   सेना   आणि   मराठा    फौज   समोरासमोरच्या   लढाईमध्ये   गुंतली   . दर वेळेस मराठे गनिमी कावा वापरात असत मात्र ह्या लढाईमध्ये मात्र मराठे मुघलांना समोरासमोर भिडले आणि भयंकर रणकंदनानंतर मुघल माघार घेत पळत सुटले हि लढाई मराठ्यां साठी मोठ्या प्रतिष्ठेची झाली . महाराजांच्या योजनेनुसार मोरोपंत पिंगळे कोकणातून तर प्रतापराव गुजर वरघाटाकडून (वरंधा ?) साल्हेरकडे आले. किल्ल्यामधील मराठी फौज आधीच इ