अभिनंदन ! भारतामध्ये प्रथमच जमिनीचे तापमान 62 डिग्री पर्यंत नोंदवले गेले आहे. वाचताना सोपं वाटत असलं तरी याचे होणारे परिणाम अतिशय भयानक आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणसे, पशुपक्षी सर्वांनाच जगणे मुश्कील होईल. जलस्तोत्र आटुन जातील, भूगर्भातील पाणीही कमी होईल व त्याची नांदी ती हळूहळू वृक्ष वठणे , जमिनीमधील आद्रता निघून गेल्याने जमीन अति शुष्क होऊन झुडपे वेली या हळूहळू मरू लागतील व त्यामुळे सर्वच जैवविविधता टप्प्याटप्प्याने नष्ट होऊ शकते. याच्या पुढील चक्रात अति उष्णतेने जे पाणी आटून गेले आहे त्याच्या वाफेने अतिशय भयानक प्रमाणात अति मुसळधार पाऊस होऊन सुपीक जमीन वाहून जाणार व याने जवळपासचे लहान-मोठे बंधारे व मोठी धरणे गाळाने भरणार. त्याचा थेट परिणाम जलसाठा व जलविद्युत प्रकल्प यावरही होईल. जमिनीचा कस निघून गेल्याने हळूहळू अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागेल व पुढील काही वर्षातच महागाई आकाशाला भिडेल. हा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असला तरी अतिउष्णतेच्या काळात झाडांचे झालेले नुकसान हा पाऊस भरून काढू शकणार नाही असे दिसते. याला कारण एकच :- मागच्या व आपल्या पिढीने केलेली भयानक वृक्षतोड ,डोंगरफोड, लँड...
Comments
Post a Comment