Posts

Showing posts from 2022

नाशिक आणि ब्रिटिश

नाशिक आणि ब्रिटिश काही कामानिमित्त शहरातील एका वेगळ्याच जागेत जाणे झाले जिथे सहसा लोक जायला घाबरतात. जीपचे काम असल्याने टाईमपास म्हणून सभोवतालच्या भागात फिरत असताना अचानक माझी नजर' ख्रिस्ती कब्रस्तान'लिहिलेल्या गेटवर पडली. नेहमीप्रमाणे अंगातला इतिहास अभ्यासक जागा झाला. स्थानिक मणीयार नावाच्या माणसाला सोबत घेऊन कब्रस्तानात प्रवेश केला. आता कबरस्तान काय फिरायची जागा नसते ,मात्र यामध्येही काही ना काही ऐतिहासिक दुवे मिळतातच. प्रचंड मोठी जागा, लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे सजवलेल्या कबरी, वाळलेली फुले, हे पहात असतानाच माझा सोबतच्या ईसमास एकच प्रश्न विचारत होतो की, येथे ब्रिटिश काळातील कबरी नक्कीच असणार. त्याने सांगितले की त्याच्या लहानपणी सदर भाग प्रचंड झाडाने भरलेला होता. गेटच्या बाजूलाच एक प्रचंड मोठी विहीर होती आणि दाट झाडीमुळे या भागात यायला लोक घाबरायचे .आता येथे सर्व जुना गाड्यांचे पार्ट खरेदी विक्री करणाऱ्या दुकानांनी बकालपणा आणलेला आहे. आणि अगदी शेवटी फिरून बाहेर निघत असताना एक कोपरा दुर्लक्षित झाला होता तेथे मला ब्रिटिशकालीन कबरी सापडल्या. बहुतांश कबरींची दुरावस्था झालेली असू...

Once a forest land always a forest land

Part 1:- Once a forest land always a forest land until it's de notified. (जी जागा गॅझेटमध्ये वनजमीन म्हणून दर्शवलेली आहे ती डी नोटिफाय झालेली नसेल तर कोणत्याही परिस्थितीत असेल तरी वनजमीनच राहील) After important 5th October 2021 Judgement by Supreme court that Revenue records cannot prevail on forest land records, today another blow to land mafias and corrupted officers. (वन विभागाच्या जमीनी वरती महसूल विभागाचे सातबारे चालणार नाहीत या 5 ऑक्टोबर 2021 च्या सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज परत एकदा सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे जो सर्व जमीन माफियांचे व भ्रष्ट नेते व अधिकारी यांचे कंबरडे मोडेल) पर्यावरण हे तुमच्या नागरिकांच्या हक्कापेक्षाही जास्ती महत्वाचे आहे. त्यामुळे जी जागा एकदा वनजमीन म्हणून जाहीर झालेली आहे ती कायमस्वरूपी वनजमीनच राहील ,जर ती डी नोटिफाय झाली नसेल तरच) वनजमीन जर एखाद्या व्यक्तीस संस्थेस द्यायची असेल तर वनसंवर्धन कायदा 1980 च्या तरतुदीनुसार सध्या सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय सदर जमीन देता येत नाही. मात्र स्थानिक सरकारे आपल्...

नाशिकचे पोलिस कमिशनर श्री दीपक पाण्डेय

नाशिकचे पोलिस कमिशनर श्री दीपक पाण्डेय यांचे महसूल विभागासंबंधित व्हायरल झालेले पत्र सर्वांच्याच वाचनात आले असेल. सर्व वर्तमानपत्रांमध्येही हे पत्र गाजत आहे . श्री पांडे यांनी पत्रात लिहिलेली एकूण एक ओळ सत्य आहे. भ्रष्टाचारात महसूल विभाग संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरला आहे, तसाच तो भारतातही आहे. लाच लुचपत खात्यातर्फे पकडल्या जाणाऱ्या सरकारी व्यक्तीं मध्ये महसूल विभागातील कर्मचारी, अधिकार यांचा नंबर सर्वात वरती असतो. पण कच्चे दुवे टाकून (टेक्निकली केस वीक करून) हे महाभाग पुढे कारवाई होऊच देत नाहीत ,कारण आशिर्वाद राजकारण्यांचे. याच विभागातील अधिकाऱ्यांकडे सर्वात जास्ती संपत्ती आहे असे दर वेळेच्या पाहणीमध्ये दिसून येते .पगार कमी, संपत्ती जास्ती मात्र कारवाई काहीही नाही. तर आपण या गरीब विभागातर्फे केल्या जाणाऱ्या गमतीजमती पाहूयात:- वन जमिनी चोरणे, व चोरून थेट बिल्डरांना विकणे, नुकत्याच आलेल्या आदेशानुसार वर्ग दोन च्या जमिनी वर्ग ऐक झाल्या. या जमिनी पूर्वी नेमक्या कोणत्या विभागाच्या व काय होत्या, कोणत्या कारणासाठी त्या वर्ग-2 केल्या गेल्या होत्या याची खातरजमा न करता जुनी पापे लपवण्यासाठी ...

सावधान। सावधान। सावधान

भाग २: सावधान। सावधान। सावधान घर घेताय? खालील बाबी / कागदपत्रे हातात आल्याशिवाय आपले हक्काचे घर / जागा बुक करू नका, मग बिल्डर कडे रेरा, महारेरा, अतिरेरा अशी कोणतीही नोंदणी असो. 1) जागा/ बिल्डिंग ही कधीही वनजमीन/ वनव्याख्येतील जमीन/ वनसद्रूश्य जमीन ( राखीववन, संरक्षितवन, गवताळ कुरण, सरकारी कुरण, सरकार, स्क्रब फाँरेस्ट, खुरट्या झुडुपांचे जंगल, गायरान, परंपोक, पाश्चर फाँरेस्ट, खाजगी वनजमीन, देवस्थानास दिलेली जमीन) यापैकी कोणत्याही सर्वे नंबरचा वा त्याला फोडुन केलेल्या गट नंबरचा भाग नव्हती / नाही हे बिल्डर / लँण्ड डेव्हलपर यांनी वन विभागाचे RFO वा त्यांस वरिष्ठ वन अधिकारी तसेच महसुल मधील तहसीलदार वा त्यांस वरिष्ठ अधिकारी यांचेकडुन शपथपत्रावर लिहुन घेणे. यापुढे बँकेनेही गृहनिर्माण व गृहकर्ज देताना या प्रकारची सावधानी बाळगावी. वनजमीन डिनोटीफाय असेल तर बांधकाम करता येते मात्र फक्त डिसफाँरेस्ट असेल तर वनेत्तर कामे करता येत नाहीत हे कायम लक्षात ठेवा. 2. गायरान, देवस्थान, ईनाम, महार वतन, कुलकर्णी वतन, ( वतनांचे १४ प्रकार होते. आता देवस्थान व वक्फ हेच बाकी आहेत. १९५० मधे ईतर१२ खालसा वतने नजराणा...

राजाची वाट

Image
राजाची वाट जानेवारी महिन्यानंतर ट्रेक थांबून गेले होते. आज जवळपास सव्वा तीन महिन्याने ट्रेकला जायचा योग आला. दुगारवाडी गावाजवळून पूर्वीची राजाची किंवा घोड्याची वाट जाते. या रस्त्याने बैलगाडी किंवा अवजड वाहने जाऊ शकत नाहीत, मात्र हलके सैन्य, घोडदळ जाऊ शकते अशी रचना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुट करताना याच रस्त्याचा वापर केला होता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सकाळी वेळ न मिळाल्याने दुपारी तीन वाजता नासिक वरून आम्ही चार जण या जागेला भेट देण्यास रवाना झालो . गाव हे डोंगर उतारावर व खूपच अवघड रस्त्या वर वसलेले आहे मात्र जीप फोर बाय फोर असल्याने बराचसा रस्ता आरामात कापता आला. ट्रेक कमी आणि फोर बाय फोर चा आनंद जास्ती घेतला गेला. गावापासून खाली उतरून गेल्यानंतर वाघ नदी लागते पावसाळ्यामध्ये वाघासारखी प्रचंड वेगाने वाहत असल्याने बहुदा हे नाव पडले असावे. दुगारवाडी धबधबा च्या बाजूने काचुरली ने जो पायवाटा रस्ता येतो तो या वाघ नदीवरून वळून पुढे गोंद्या घाटाला मिळतो. याच ठिकाणी अत्यंत जुने असे पुलाचे ? अवशेष पाहायला मिळाले .यावर बहुदा ब्रिटिश काळात थोडीफार डागडुजी ही झाली असावी, कारण खडी...

When the last Tiger got shot in Nashik District

Image
When the last Tiger got shot in Nashik District ? People dont dare to cut the trees / grass in the Jungle where the Majestic animal *Tigers*are. Tigers are the protectors of the Jungle. Tribal people who are original residents of Jungle area worship Tigers as a God. After independence tigers, Lepards, Wolves , Foxes, Bears from Jungles of Maharashtra and Crocodiles, Ghairyal (Susar) from rivers were deliberately killed to get open access to natural resources. The animals like Deers, Sambar, Mouse Deers , Rabbits were also got killed for food as there was no fear of Tigers while entering in jungle. The discipline British officers were following, Indian officers and politicians were failed to follow it and the Jungles got openly looted. When the last tiger got killed in Nashik District ? Hear are the authentic information. The last one big cat was killed in 1967-68 in Trimbak range. The Majestic animal was gone , the Jungle was also started reducing. Few Tigers visited Nashik from ...

नागपूरचे रघुजी भोसले

नागपूरचे रघुजी भोसले आणि त्यांच्या मराठा सैन्यदलाचा प्रभाव व प्रचंड धाक पूर्व भारतावर होता हे सर्वानाच माहित आहे मात्र सहज वाचन करताना ओडिशा ( पूर्वीचा ओढ्या प्रांत) आणि बंगाल मध्ये मराठा घोडदलाचा काय धाक होता हे अजूनही लहान मुलंमुलींना झोपवताना गायिल्या जाणारया ह्या बंगाली गाण्यांमधून कळतो : 'छेले घुमालो वाडा झूलालो बोर्गी एलो देशे . बुलबुलीते धान खेयेछे खजाना देबो किशे ?' अर्थात : मुले झोपली, चाळ झोपली, मराठा बारगीर ( बोर्गी) आले रे आले , पक्ष्यानी धान्य खाऊन टाकले आता खंडणी कुठून देऊ रे ? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळमध्ये स्थापन केलेल्या स्वराज्याला पंख फुटून ते दिल्ली, पंजाब, माळवा , नेमाड, बुंदेलखंड, ओढ्या, बंगाल, गुजरात, कर्नाटक , तामिळनाडू पर्यंत पोहचले होते. मात्र छत्रपतींच्या काळामधील घराणी दाबून टाकणे, पेशवांच्या सरदारांमधील भांडणे, खेकडा प्रवृत्ती ह्यामुळे हळूहळू सर्वच ठिकाणी राज्य करणारी घराणी हि मराठा साम्राज्य ना वाढवता सत्ता हातामधून जाऊन इंग्रज काळात स्थान...

जागतीक तापमानवाढ

अभिनंदन ! भारतामध्ये प्रथमच जमिनीचे तापमान 62 डिग्री पर्यंत नोंदवले गेले आहे. वाचताना सोपं वाटत असलं तरी याचे होणारे परिणाम अतिशय भयानक आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणसे, पशुपक्षी सर्वांनाच जगणे मुश्कील होईल. जलस्तोत्र आटुन जातील, भूगर्भातील पाणीही कमी होईल व त्याची नांदी ती हळूहळू वृक्ष वठणे , जमिनीमधील आद्रता निघून गेल्याने जमीन अति शुष्क होऊन झुडपे वेली या हळूहळू मरू लागतील व त्यामुळे सर्वच जैवविविधता टप्प्याटप्प्याने नष्ट होऊ शकते. याच्या पुढील चक्रात अति उष्णतेने जे पाणी आटून गेले आहे त्याच्या वाफेने अतिशय भयानक प्रमाणात अति मुसळधार पाऊस होऊन सुपीक जमीन वाहून जाणार व याने जवळपासचे लहान-मोठे बंधारे व मोठी धरणे गाळाने भरणार. त्याचा थेट परिणाम जलसाठा व जलविद्युत प्रकल्प यावरही होईल. जमिनीचा कस निघून गेल्याने हळूहळू अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागेल व पुढील काही वर्षातच महागाई आकाशाला भिडेल. हा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असला तरी अतिउष्णतेच्या काळात झाडांचे झालेले नुकसान हा पाऊस भरून काढू शकणार नाही असे दिसते. याला कारण एकच :- मागच्या व आपल्या पिढीने केलेली भयानक वृक्षतोड ,डोंगरफोड, लँड...