When the last Tiger got shot in Nashik District

When the last Tiger got shot in Nashik District ? People dont dare to cut the trees / grass in the Jungle where the Majestic animal *Tigers*are. Tigers are the protectors of the Jungle. Tribal people who are original residents of Jungle area worship Tigers as a God. After independence tigers, Lepards, Wolves , Foxes, Bears from Jungles of Maharashtra and Crocodiles, Ghairyal (Susar) from rivers were deliberately killed to get open access to natural resources. The animals like Deers, Sambar, Mouse Deers , Rabbits were also got killed for food as there was no fear of Tigers while entering in jungle. The discipline British officers were following, Indian officers and politicians were failed to follow it and the Jungles got openly looted. When the last tiger got killed in Nashik District ? Hear are the authentic information. The last one big cat was killed in 1967-68 in Trimbak range. The Majestic animal was gone , the Jungle was also started reducing. Few Tigers visited Nashik from either Jawahar or Bhandardara side, but they were nomads and not the residents. Should there be Tigers in these Jungles, no mining or illegal tree failing was possible. To confirm, Authentic document received by Forest Department attached .
नाशिक जिल्ह्यातील शेवटचा वाघ कधी मारला गेला ? ज्या जंगलामध्ये जंगलचा राजा वाघ आहे तेथे मनुष्यप्राणी वृक्षतोड किंवा गवत काढणीसाठी जाताना दहा वेळा विचार करतात. अनेक आदिवासी हे वाघांना देव मानतात व वाघ देव मानून त्याची पूजा ही होते . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोर्‍या लोकांनी पाळलेली शिस्त आपले राजकारणी व अधिकाऱ्यांना जमली नाही व काही दिवसातच जंगलांमध्ये मोकळेपणे शिरकाव मिळावा म्हणून जंगलातील वाघ, बिबटे ,लांडगे, कोल्हे, अस्वले तर नदीतील मगरी व सुसरी मुक्तपणे मारण्यात आल्या. यामुळे जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करताना व नदीतील वाळू उपसतांना कोणाचेही भय राहिले नाही. या पाठोपाठच हरिण, सांबर, चितळ वगैरे तृणभक्षी प्राण्यांची ही पद्धतशीरपणे वाट लावण्यात आली .वाघ संपले व त्यामागोमाग जंगलही . नाशिककरांच्या दुर्दैवाने नाशिक जिल्ह्यात शेवटचा वाघ 67- 68 साली त्रंबकेश्वर भागात मारला गेला, त्यानंतर नाशिक जिल्ह्यात पट्टेदार वाघाचे उल्लेख सापडत नाहीत . जर अजूनही त्रंयंबकेश्‍वर इगतपुरी पट्ट्यात वाघ असते तर कोणाची हिंमत होती जंगले तोडायची आणि डोंगर फोडायची? फिरस्तीवरील वाघ जे जव्हार बाजूने आले गेले असावेत किंवा भंडारदारा बाजूने यांची गोष्ट वेगळी. सदर माहितीस पुष्टी देणारे वन विभागाचेच अधिकृत कागद सोबत जोडत आहे. धन्यवाद! अंबरीश मोरे. नाशिक. 25/05/2022

Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap