नागपूरचे रघुजी भोसले
नागपूरचे रघुजी भोसले आणि त्यांच्या मराठा सैन्यदलाचा प्रभाव व प्रचंड धाक पूर्व भारतावर होता हे सर्वानाच माहित आहे मात्र सहज वाचन करताना ओडिशा ( पूर्वीचा ओढ्या प्रांत) आणि बंगाल मध्ये मराठा घोडदलाचा काय धाक होता हे अजूनही लहान मुलंमुलींना झोपवताना गायिल्या जाणारया ह्या बंगाली गाण्यांमधून कळतो : 'छेले घुमालो वाडा झूलालो बोर्गी एलो देशे . बुलबुलीते धान खेयेछे खजाना देबो किशे ?' अर्थात : मुले झोपली, चाळ झोपली, मराठा बारगीर ( बोर्गी) आले रे आले , पक्ष्यानी धान्य खाऊन टाकले आता खंडणी कुठून देऊ रे ? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळमध्ये स्थापन केलेल्या स्वराज्याला पंख फुटून ते दिल्ली, पंजाब, माळवा , नेमाड, बुंदेलखंड, ओढ्या, बंगाल, गुजरात, कर्नाटक , तामिळनाडू पर्यंत पोहचले होते. मात्र छत्रपतींच्या काळामधील घराणी दाबून टाकणे, पेशवांच्या सरदारांमधील भांडणे, खेकडा प्रवृत्ती ह्यामुळे हळूहळू सर्वच ठिकाणी राज्य करणारी घराणी हि मराठा साम्राज्य ना वाढवता सत्ता हातामधून जाऊन इंग्रज काळात स्थानिक पातळीवर लहान प्रमाणात टिकून राहिली . ( लक्ष्यात घ्या कि होळकर, शिंदे , धुळप ,राजेबहाद्दर इत्यादी हि पेशवा लष्करामधील घराणी होय, तसेच आंग्रे, घोरपडे- गुत्ती , भोसले, पवार, दाभाडे , पंतप्रतिनिधी, हि थोरले छत्रपती ते पहिले शाहू महाराज ह्यांच्या काळामधील घराणी होय) बाळाजी विश्वनाथ ,महादजी शिंदे ह्येनी 'दिल्ली चे हि तख्त राखतो महाराष्ट्र' माझा पासून ते १८१८ मध्ये पेशवाई बुडणे ह्याला फक्त आपापसामधील दुरावा कारणीभूत ठरला. छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या मृत्यूनंतर सरदारांवर वचक ठेवणारा नाहीसा झाल्यामुळे हळूहळू सरदार मंडळी स्वयंघोषित राजे झाले मात्र गुजरात मध्ये गायकवाड, धार -देवास चे पवार , ग्वालियरचे शिंदे , इंदोरचे होळकर, गुत्तीकर घोरपडे, बुंदेलखंडामध्ये पहिल्या बाजीरावचा नातू अली बहादर ( बांदाचे नवाब) , नागपूरकर भोसले हयांनी आपापला दबदबा कायम राखला होता. तेव्हा नाना फडणविसाने शिंदे, होळकर, घोरपडे, भोसले ह्यांचा मराठा मंडळ वाढवण्यासाठी उपयॊग ना करता स्वतःचे वजन राहावे म्हणून खेळ व उद्योग केले व शेवटी अक्खी पेशवाई किंवा थोडक्यात मराठा साम्राज्य बुडाले, जर मराठा मंडळ टिकते तर उभा भारत आजही मराठा साम्राज्याच्या आधीन असता. ( परकी युरोपियन सत्ता व मराठा संघर्ष हा वेगळा मुद्दा)
पण साहेब जर- तरला इतिहासामध्ये स्थान नसते. आणि हे हेवेदावे, दुरावे सध्याही महाराष्ट्र मध्ये चालू आहेत हे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून दिसून आले. कधी काळी दिल्लीची पातशाही रक्षण करणारे, स्थानिक जहागीरदारी मिळावी म्हणून कुत्र्यागत आपापसामध्ये भांडत होते व पोराबाळांना तिकीट मिळावे म्हणून घडी घडीला पक्ष बदलत होते ( हि नवीन राजकीय सरदार घराणी, सत्ता काहीही झाली तरी हातामधून जाऊ देणार नाहीत, कधी मोगलाईमध्ये , कधी निजामशाही, कधी आदिलशाही , कधी कुतुबशाही वाटलं तर स्वराज पण सत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे , कार्यकर्त्यांनो उचला सतरंज्या ), हे सर्वानीच बघितले.एक दोघांनी दिलीधीशाचे पायच धरले, दुसरे प्रबोधनकारांचे वंशज भाकड कीर्तनकार झाले, चला साधुवाण्याची गोष्ट ऐकू, माफी असावी विडिओ बघू (खऱ्या समाजसुधारक कीर्तनकारांची माफी आधीच मागून टाकतो ) आणि सहयाद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला अशी ख्याती असलेल्या यशवंतरावांचे शिष्य पंतप्रधान होण्याची लायकी असणारे दुसर्यांना पाठिंबा देत बसले हे असे झाले बघा. मग मराठा मंडळाने दिल्ली कशी बुवा गाठावी? मग महाराष्ट्रातून पंतप्रधान कधी होणार? ( सद्य स्थितीमध्ये अशक्य दिसते ) (मराठा = पूर्वी जो कोणी मराठी सेनेमध्ये होता मग तो जातीने कोणीही असो तो बाहेरच्या लोकांमध्ये मराठा समजला जायचा. ) वाईट वाटते ( महाराष्ट्रासाठी, ह्यांच्यासाठी नाही ) एकंदरीतच पुरोगामी महाराष्ट्राला ऊर्ध्व लागू लागले आहे असे दिसते.
मात्र परत एकदा मूळ विषय तो नागपूर आणि भोसले ह्यांचा, जर भोसल्याना योग्य पाठबळ मिळते तर ओडिशा आणि बंगाल त्यांच्या स्वाधीन राहिला असता व प्लासी ची लढाई मुघल, बंगालचा नवाब आणि अयोध्याचा नवाब विरुद्ध इंग्रज ह्यांच्यामध्ये न होता भोसले आणि इंग्रज ह्यांमधे झाली असती हे नक्की
अंबरीश मोरे , नाशिक
30/04/2019
Comments
Post a Comment