नाशिक आणि ब्रिटिश
नाशिक आणि ब्रिटिश काही कामानिमित्त शहरातील एका वेगळ्याच जागेत जाणे झाले जिथे सहसा लोक जायला घाबरतात. जीपचे काम असल्याने टाईमपास म्हणून सभोवतालच्या भागात फिरत असताना अचानक माझी नजर' ख्रिस्ती कब्रस्तान'लिहिलेल्या गेटवर पडली. नेहमीप्रमाणे अंगातला इतिहास अभ्यासक जागा झाला. स्थानिक मणीयार नावाच्या माणसाला सोबत घेऊन कब्रस्तानात प्रवेश केला. आता कबरस्तान काय फिरायची जागा नसते ,मात्र यामध्येही काही ना काही ऐतिहासिक दुवे मिळतातच. प्रचंड मोठी जागा, लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे सजवलेल्या कबरी, वाळलेली फुले, हे पहात असतानाच माझा सोबतच्या ईसमास एकच प्रश्न विचारत होतो की, येथे ब्रिटिश काळातील कबरी नक्कीच असणार. त्याने सांगितले की त्याच्या लहानपणी सदर भाग प्रचंड झाडाने भरलेला होता. गेटच्या बाजूलाच एक प्रचंड मोठी विहीर होती आणि दाट झाडीमुळे या भागात यायला लोक घाबरायचे .आता येथे सर्व जुना गाड्यांचे पार्ट खरेदी विक्री करणाऱ्या दुकानांनी बकालपणा आणलेला आहे. आणि अगदी शेवटी फिरून बाहेर निघत असताना एक कोपरा दुर्लक्षित झाला होता तेथे मला ब्रिटिशकालीन कबरी सापडल्या. बहुतांश कबरींची दुरावस्था झालेली असू