Posts

निसर्गाचा खरा शत्रू माणूसच

  निसर्गाचा खरा शत्रू माणूसच आहे यात काहीही वाद नाही .   कारण माणूस सोडून इतर कोणताही प्राणी पोट भरलेले असल्यास शिकार करत नाही , झाडं तोडत नाही , आणि प्रदूषणही करत नाही .   तो त्याच्या गरजेपुरतेच अन्न मिळवतो , मात्र उत्क्रांती मध्ये माणसाला वस्तू साठवणे व ती भविष्यासाठी वापरणे ही कला जमू लागली आणि त्यामुळे जास्तीत जास्त वस्तू गोळा करणे हा माणसाचा स्वभाव बनत गेला .   याचमुळे   अनेकदा आपण न लागणाऱ्या गोष्टीही गोळा करत असतो . या स्वभावानुसारच सध्या सर्व जगात चालू असलेले ग्लोबल वॉर्मिंगचे संकट हे माणसाच्या या साठा करण्याच्या प्रवृत्ती मागे दडलेले आहे .   *बाकी देशात काय चालू आहे* ? ऑस्ट्रेलिया , न्यूझीलंड , अमेरिका , कॅनडा येथे लागणाऱ्या प्रचंड मोठ्या आगी, रशियातील सायबेरिया चा 65 लाख हेक्टर जंगल भाग जळून खाक होणे , तर त्याच बरोबर युरोपमध्ये अचानक येणारे पूर जे गेल्या शेकडो वर्षात युरोपियन देशांनी पाहिलेले नाहीत ग्रीनलँड , आर्टिक , अंटार्टिक येथे...