Posts

नाशिक आणि ब्रिटिश

नाशिक आणि ब्रिटिश काही कामानिमित्त शहरातील एका वेगळ्याच जागेत जाणे झाले जिथे सहसा लोक जायला घाबरतात. जीपचे काम असल्याने टाईमपास म्हणून सभोवतालच्या भागात फिरत असताना अचानक माझी नजर' ख्रिस्ती कब्रस्तान'लिहिलेल्या गेटवर पडली. नेहमीप्रमाणे अंगातला इतिहास अभ्यासक जागा झाला. स्थानिक मणीयार नावाच्या माणसाला सोबत घेऊन कब्रस्तानात प्रवेश केला. आता कबरस्तान काय फिरायची जागा नसते ,मात्र यामध्येही काही ना काही ऐतिहासिक दुवे मिळतातच. प्रचंड मोठी जागा, लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे सजवलेल्या कबरी, वाळलेली फुले, हे पहात असतानाच माझा सोबतच्या ईसमास एकच प्रश्न विचारत होतो की, येथे ब्रिटिश काळातील कबरी नक्कीच असणार. त्याने सांगितले की त्याच्या लहानपणी सदर भाग प्रचंड झाडाने भरलेला होता. गेटच्या बाजूलाच एक प्रचंड मोठी विहीर होती आणि दाट झाडीमुळे या भागात यायला लोक घाबरायचे .आता येथे सर्व जुना गाड्यांचे पार्ट खरेदी विक्री करणाऱ्या दुकानांनी बकालपणा आणलेला आहे. आणि अगदी शेवटी फिरून बाहेर निघत असताना एक कोपरा दुर्लक्षित झाला होता तेथे मला ब्रिटिशकालीन कबरी सापडल्या. बहुतांश कबरींची दुरावस्था झालेली असू...

Once a forest land always a forest land

Part 1:- Once a forest land always a forest land until it's de notified. (जी जागा गॅझेटमध्ये वनजमीन म्हणून दर्शवलेली आहे ती डी नोटिफाय झालेली नसेल तर कोणत्याही परिस्थितीत असेल तरी वनजमीनच राहील) After important 5th October 2021 Judgement by Supreme court that Revenue records cannot prevail on forest land records, today another blow to land mafias and corrupted officers. (वन विभागाच्या जमीनी वरती महसूल विभागाचे सातबारे चालणार नाहीत या 5 ऑक्टोबर 2021 च्या सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज परत एकदा सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे जो सर्व जमीन माफियांचे व भ्रष्ट नेते व अधिकारी यांचे कंबरडे मोडेल) पर्यावरण हे तुमच्या नागरिकांच्या हक्कापेक्षाही जास्ती महत्वाचे आहे. त्यामुळे जी जागा एकदा वनजमीन म्हणून जाहीर झालेली आहे ती कायमस्वरूपी वनजमीनच राहील ,जर ती डी नोटिफाय झाली नसेल तरच) वनजमीन जर एखाद्या व्यक्तीस संस्थेस द्यायची असेल तर वनसंवर्धन कायदा 1980 च्या तरतुदीनुसार सध्या सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय सदर जमीन देता येत नाही. मात्र स्थानिक सरकारे आपल्...

नाशिकचे पोलिस कमिशनर श्री दीपक पाण्डेय

नाशिकचे पोलिस कमिशनर श्री दीपक पाण्डेय यांचे महसूल विभागासंबंधित व्हायरल झालेले पत्र सर्वांच्याच वाचनात आले असेल. सर्व वर्तमानपत्रांमध्येही हे पत्र गाजत आहे . श्री पांडे यांनी पत्रात लिहिलेली एकूण एक ओळ सत्य आहे. भ्रष्टाचारात महसूल विभाग संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरला आहे, तसाच तो भारतातही आहे. लाच लुचपत खात्यातर्फे पकडल्या जाणाऱ्या सरकारी व्यक्तीं मध्ये महसूल विभागातील कर्मचारी, अधिकार यांचा नंबर सर्वात वरती असतो. पण कच्चे दुवे टाकून (टेक्निकली केस वीक करून) हे महाभाग पुढे कारवाई होऊच देत नाहीत ,कारण आशिर्वाद राजकारण्यांचे. याच विभागातील अधिकाऱ्यांकडे सर्वात जास्ती संपत्ती आहे असे दर वेळेच्या पाहणीमध्ये दिसून येते .पगार कमी, संपत्ती जास्ती मात्र कारवाई काहीही नाही. तर आपण या गरीब विभागातर्फे केल्या जाणाऱ्या गमतीजमती पाहूयात:- वन जमिनी चोरणे, व चोरून थेट बिल्डरांना विकणे, नुकत्याच आलेल्या आदेशानुसार वर्ग दोन च्या जमिनी वर्ग ऐक झाल्या. या जमिनी पूर्वी नेमक्या कोणत्या विभागाच्या व काय होत्या, कोणत्या कारणासाठी त्या वर्ग-2 केल्या गेल्या होत्या याची खातरजमा न करता जुनी पापे लपवण्यासाठी ...

सावधान। सावधान। सावधान

भाग २: सावधान। सावधान। सावधान घर घेताय? खालील बाबी / कागदपत्रे हातात आल्याशिवाय आपले हक्काचे घर / जागा बुक करू नका, मग बिल्डर कडे रेरा, महारेरा, अतिरेरा अशी कोणतीही नोंदणी असो. 1) जागा/ बिल्डिंग ही कधीही वनजमीन/ वनव्याख्येतील जमीन/ वनसद्रूश्य जमीन ( राखीववन, संरक्षितवन, गवताळ कुरण, सरकारी कुरण, सरकार, स्क्रब फाँरेस्ट, खुरट्या झुडुपांचे जंगल, गायरान, परंपोक, पाश्चर फाँरेस्ट, खाजगी वनजमीन, देवस्थानास दिलेली जमीन) यापैकी कोणत्याही सर्वे नंबरचा वा त्याला फोडुन केलेल्या गट नंबरचा भाग नव्हती / नाही हे बिल्डर / लँण्ड डेव्हलपर यांनी वन विभागाचे RFO वा त्यांस वरिष्ठ वन अधिकारी तसेच महसुल मधील तहसीलदार वा त्यांस वरिष्ठ अधिकारी यांचेकडुन शपथपत्रावर लिहुन घेणे. यापुढे बँकेनेही गृहनिर्माण व गृहकर्ज देताना या प्रकारची सावधानी बाळगावी. वनजमीन डिनोटीफाय असेल तर बांधकाम करता येते मात्र फक्त डिसफाँरेस्ट असेल तर वनेत्तर कामे करता येत नाहीत हे कायम लक्षात ठेवा. 2. गायरान, देवस्थान, ईनाम, महार वतन, कुलकर्णी वतन, ( वतनांचे १४ प्रकार होते. आता देवस्थान व वक्फ हेच बाकी आहेत. १९५० मधे ईतर१२ खालसा वतने नजराणा...

राजाची वाट

Image
राजाची वाट जानेवारी महिन्यानंतर ट्रेक थांबून गेले होते. आज जवळपास सव्वा तीन महिन्याने ट्रेकला जायचा योग आला. दुगारवाडी गावाजवळून पूर्वीची राजाची किंवा घोड्याची वाट जाते. या रस्त्याने बैलगाडी किंवा अवजड वाहने जाऊ शकत नाहीत, मात्र हलके सैन्य, घोडदळ जाऊ शकते अशी रचना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुट करताना याच रस्त्याचा वापर केला होता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सकाळी वेळ न मिळाल्याने दुपारी तीन वाजता नासिक वरून आम्ही चार जण या जागेला भेट देण्यास रवाना झालो . गाव हे डोंगर उतारावर व खूपच अवघड रस्त्या वर वसलेले आहे मात्र जीप फोर बाय फोर असल्याने बराचसा रस्ता आरामात कापता आला. ट्रेक कमी आणि फोर बाय फोर चा आनंद जास्ती घेतला गेला. गावापासून खाली उतरून गेल्यानंतर वाघ नदी लागते पावसाळ्यामध्ये वाघासारखी प्रचंड वेगाने वाहत असल्याने बहुदा हे नाव पडले असावे. दुगारवाडी धबधबा च्या बाजूने काचुरली ने जो पायवाटा रस्ता येतो तो या वाघ नदीवरून वळून पुढे गोंद्या घाटाला मिळतो. याच ठिकाणी अत्यंत जुने असे पुलाचे ? अवशेष पाहायला मिळाले .यावर बहुदा ब्रिटिश काळात थोडीफार डागडुजी ही झाली असावी, कारण खडी...

When the last Tiger got shot in Nashik District

Image
When the last Tiger got shot in Nashik District ? People dont dare to cut the trees / grass in the Jungle where the Majestic animal *Tigers*are. Tigers are the protectors of the Jungle. Tribal people who are original residents of Jungle area worship Tigers as a God. After independence tigers, Lepards, Wolves , Foxes, Bears from Jungles of Maharashtra and Crocodiles, Ghairyal (Susar) from rivers were deliberately killed to get open access to natural resources. The animals like Deers, Sambar, Mouse Deers , Rabbits were also got killed for food as there was no fear of Tigers while entering in jungle. The discipline British officers were following, Indian officers and politicians were failed to follow it and the Jungles got openly looted. When the last tiger got killed in Nashik District ? Hear are the authentic information. The last one big cat was killed in 1967-68 in Trimbak range. The Majestic animal was gone , the Jungle was also started reducing. Few Tigers visited Nashik from ...

नागपूरचे रघुजी भोसले

नागपूरचे रघुजी भोसले आणि त्यांच्या मराठा सैन्यदलाचा प्रभाव व प्रचंड धाक पूर्व भारतावर होता हे सर्वानाच माहित आहे मात्र सहज वाचन करताना ओडिशा ( पूर्वीचा ओढ्या प्रांत) आणि बंगाल मध्ये मराठा घोडदलाचा काय धाक होता हे अजूनही लहान मुलंमुलींना झोपवताना गायिल्या जाणारया ह्या बंगाली गाण्यांमधून कळतो : 'छेले घुमालो वाडा झूलालो बोर्गी एलो देशे . बुलबुलीते धान खेयेछे खजाना देबो किशे ?' अर्थात : मुले झोपली, चाळ झोपली, मराठा बारगीर ( बोर्गी) आले रे आले , पक्ष्यानी धान्य खाऊन टाकले आता खंडणी कुठून देऊ रे ? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळमध्ये स्थापन केलेल्या स्वराज्याला पंख फुटून ते दिल्ली, पंजाब, माळवा , नेमाड, बुंदेलखंड, ओढ्या, बंगाल, गुजरात, कर्नाटक , तामिळनाडू पर्यंत पोहचले होते. मात्र छत्रपतींच्या काळामधील घराणी दाबून टाकणे, पेशवांच्या सरदारांमधील भांडणे, खेकडा प्रवृत्ती ह्यामुळे हळूहळू सर्वच ठिकाणी राज्य करणारी घराणी हि मराठा साम्राज्य ना वाढवता सत्ता हातामधून जाऊन इंग्रज काळात स्थान...

जागतीक तापमानवाढ

अभिनंदन ! भारतामध्ये प्रथमच जमिनीचे तापमान 62 डिग्री पर्यंत नोंदवले गेले आहे. वाचताना सोपं वाटत असलं तरी याचे होणारे परिणाम अतिशय भयानक आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणसे, पशुपक्षी सर्वांनाच जगणे मुश्कील होईल. जलस्तोत्र आटुन जातील, भूगर्भातील पाणीही कमी होईल व त्याची नांदी ती हळूहळू वृक्ष वठणे , जमिनीमधील आद्रता निघून गेल्याने जमीन अति शुष्क होऊन झुडपे वेली या हळूहळू मरू लागतील व त्यामुळे सर्वच जैवविविधता टप्प्याटप्प्याने नष्ट होऊ शकते. याच्या पुढील चक्रात अति उष्णतेने जे पाणी आटून गेले आहे त्याच्या वाफेने अतिशय भयानक प्रमाणात अति मुसळधार पाऊस होऊन सुपीक जमीन वाहून जाणार व याने जवळपासचे लहान-मोठे बंधारे व मोठी धरणे गाळाने भरणार. त्याचा थेट परिणाम जलसाठा व जलविद्युत प्रकल्प यावरही होईल. जमिनीचा कस निघून गेल्याने हळूहळू अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागेल व पुढील काही वर्षातच महागाई आकाशाला भिडेल. हा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असला तरी अतिउष्णतेच्या काळात झाडांचे झालेले नुकसान हा पाऊस भरून काढू शकणार नाही असे दिसते. याला कारण एकच :- मागच्या व आपल्या पिढीने केलेली भयानक वृक्षतोड ,डोंगरफोड, लँड...

Fort Achala :

Image
Fort Achala : (4040 feet. Base village Pimpri Anchala). A rough forest road takes us at the base of the fort. Its semi complete road and once done, max forest will be gone as saw huge tree cutting on the way to the fort. Fort Achala is an old fort and was mainly used as a watch station. In the time of Chh. Shivaji maharaj it was won by Maratha army and was under Maratha rule till the nearest biggest fort Ahiwantgad got won by Mughals in 1676. It again came under Maratha power in 1754 till won by the British in 1818. The details show it must a fort from Satvahan time. 7 to 8 destroyed houses , 9 water tanks with 3 tanks having water and very few other ruins can be seen on it. Toulya, Hatgad, Ahiwant, Wani, were visible today from it. On the way to trek we saw temple in Ahiwantwadi which is having very old stone pillers. When asked people told us that they got it from another village which is behind the mountian. Overall good trek in good hot season. AND don't forgot to watc...

भग्न मंदिरांचे बिलवाडी :

Image
रविवारी अहिवंत गडाच्या ट्रेक नंतर तेथून साडेतीन किलोमीटरवर असलेल्या बिलवाडी येथील अत्यंत जुन्या अशा मंदिरांना आम्ही भेट दिली. आमचे ट्रेकर मित्र श्री प्रशांत परदेशी यांनी मागील वर्षी सातमाळा रेंज ट्रेक केला होता तेव्हा सुरगाणा तालुक्यात हरण बारी जवळ त्यांना एक नवीन बांधलेले मंदिर आढळले. त्याचे खांब हे अत्यंत जुन्या पद्धतीचे होते छताला आधार देणारे यक्ष जमिनीत गाडले होते तर जमिनीतील राक्षस छतावर लावलेले होते. त्यांनी कुतुहलाने विचारले असता जवळच बिलवाडी येथे खूप पडकी मंदिरे असून ज्याला लागेल तो ट्रॅक्टर भरून नक्षीदार दगडी घेऊन येतो असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांना आत्यंतिक धक्का बसल्याने त्यांनी सदर मंदिराला भेट दिली असता अत्यंत वाईट अवस्थेतील मंदिरे त्यांना दिसली. म्हणूनच त्यांनी आवर्जून ट्रेक नंतर मंदिरांना भेट द्या असे आम्हाला सांगितले होते. दमलेले असूनही सर्वजण मंदिराकडे रवाना झालो. शासनाने? नुकताच मंदिरापर्यंत रस्ता बनवायचे काम हाती घेतलेले आहे, तेही अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने. की ज्यात रस्ता हा थेट मंदिराला लागूनच काढलेला आहे. तसेच रस्त्यात येणारी प्रचंड मोठी झाडे ही विनापरवाना तोडल...

फुलपाखरांचा किल्ला अहिवंत गड:

Image
नाशिक पासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावरती सप्तशृंगी गडाच्या अगदी समोर जो प्रचंड विस्ताराचा डोंगर दिसतो तोच आहे किल्ले अहिवंत गड. ईखारा, धोडप ,मार्कंडेय, सप्तशृंगी गड, अहिवंत गड, अचला ही एक किल्ल्यांची लाईनच आहे जि पुर्वीच्या व्यापार रस्त्यांची सुरक्षितता ठेवत असे. सदर किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापासून असून तेव्हापासूनच हे किल्ले उपयोगात असावेत असे दिसते. सप्तशृंगी गडाकडे न वळता डावीकडे दरेगावकडे वळताच एक नवीन रस्ता दरे गाव ते बिलवाडी असा डोंगर फोडून झालेला आहे. ह्या रस्त्याने गेल्यास किल्ल्याच्या पोटाला गाडी लावता येते व तेथून किल्ल्याच्या पोटातुनच एक रस्ता हा मुख्य दरवाज्याकडे जातो. प्रचंड झाडी व पुढे आलेल्या डोंगरामुळे शेवटपर्यंत किल्ल्याचा प्रवेश कुठे आहे हे समजून येत नाही. हा किल्ला यादव, बहामनी, आदिलशाही, मोगल ,मराठे परत मोगल व नंतर परत मराठेशाहीत आला अशा नोंदी सापडतात. सुरतेच्या स्वारी आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना नाशिक व बागलाण वर पाठवून एकाच धडाक्यात सर्व किल्ले जिंकून घेतले होते त्यातच हा गडही होता. मात्र एकच वर्षाने मोगलांच्या जवळपास चाळीस हजार सैन्या...

*सरदारा*

Image
सत्य कथा. गोष्ट असेल १९९०-९१ ची. मी त्यावेळी सहावीमध्ये असेन. नवीनच बांधलेल्या आमच्या बिल्डिंगमध्ये एक सरदार राहायला आले .गोरेपान पावणेसहा फूट उंच, शांत चेहरा. आपण हसलो तर हसणार नाहीतर निर्मळ चेहेर्याने समोरून निघुन जाणार. त्याच्या चेहर्याभोवती ऐक गुढ वलय होते.नवीनच रहायला गेल्याने अजून एकमेकांशी नीट कोणाशीच ओळख झालेली नव्हती मात्र सरदारजींचे ईंपोर्ट केलेल्या वस्तुंचे दुकान होते असे समजले. हळूहळू बिल्डिंग मधील लोक ऐकमेकांना ओळखु लागले. पण सरदारजी ऐकटेच राहतात हे सोडुन त्यांच्याबद्दल बाकी काहीही माहीती नव्हती. आम्ही लहान मुले त्यांना नमस्ते अंकल जी असे म्हणत असू व उत्तरा देखील ते एक मंद स्मित करून पुढे निघुन जात असत. आम्ही मुलांनी लवकरच त्यांचे छोटेसे दुकान शोधून काढलं यामध्ये आम्हाला अप्रूप वाटणार्या व त्या काळी सहसा न मिळणाऱ्या इम्पोर्टेड वस्तूंची रेलचेल होती. आम्ही मुद्दाम त्यांच्या दुकानासमोरून सायकलने जाता जाता त्यांना हात देऊन व लांबूनच नमस्ते अंकलजी असे ओरडून पुढे जात असू व तेही आम्हाला शांततेत हसून हात देत असत. महिन्या-दोन महिन्यात कधीतरी त्यांचा एक पुतण्या त्यांना भेटायला य...

साल्हेरची लढाई व कवी भूषण

Image
  " साल्हेरची लढाई व कवी भूषण "    मराठ्यांनी १६७० मध्ये बागलाणात हातपाय पसरण्यास सुरुवात केली . बागलाणचा मुख्य किल्ला साल्हेर जिंकून औरंगजेबाच्या जखमेवर मीठच चोळले गेले . त्यामुळे त्याने आपला दूध भाऊ बहादूरखान कोका ( कोकलताश ) ह्याला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले त्याचा इख्लासखान मियाना हा मुख्य लढाऊ इसम होता       ( औरंगजेब तरुण असताना दक्खनच्या सुभेदारीवर होता व त्यामुळेच साल्हेर चे महत्व जाणून होता )   . मराठ्यांच्या   इतिहासात   1671 ची साल्हेर ची   लढाई   हि   फारच   महत्वाची   आहे   . पहिल्यान्दाच   मुघल   सेना   आणि   मराठा    फौज   समोरासमोरच्या   लढाईमध्ये   गुंतली   . दर वेळेस मराठे गनिमी कावा वापरात असत मात्र ह्या लढाईमध्ये मात्र मराठे मुघलांना समोरासमोर भिडले आणि भयंकर रणकंदनानंतर मुघल माघार घेत पळत सुटले हि लढाई मराठ्यां साठी मोठ्या प्रतिष्ठेची झाली . महाराजां...